10 महापालिकांसह, 25 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
मुंबई, ठाण्यात शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर नाशिकमध्ये राज यांचं काय होणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर दुसरीकडे नगरपालिकेत नंबर वन ठरलेल्या भाजपचं मोठं आव्हान शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर असणार आहे.
मुंबई-ठाण्यासह 10 महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी केली.
तर दुसऱ्या टप्प्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होईल.
दरम्यान, नागपूर वगळता 25 जिल्हा परिषदांसाठी दोन टप्प्यात मतदान होईल. त्यात विदर्भ आणि मराठवाड्यात पहिल्या टप्प्यात म्हणजे 16 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
त्यानुसार मुंबई, ठाणे,पुणे,पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, सोलापूर, अकोला, अमरावती, उल्हासनगर या 10 महापालिकांसाठी एकाच टप्प्यात 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 23 फेब्रुवारी मतमोजणी होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -