तुकाराम मुंढेंच्या Exclusive मुलाखतीतील 10 मुद्दे

बदली झालीच, तर.... - जर बदली झालीच, तर जिथे बदली होईल, तिथेही जोमाने, यापेक्षा जास्त उत्साहाने काम करेन, असं मुंढे म्हणाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जिथे बदली होईल, तिथे जोमाने काम करेन - अविश्वास ठराव मंजूर झाला असला, तरी सरकार जोपर्यंत हटवत नाही, तोपर्यंत इथे काम करत राहणार.

मी माणूस, सर्वज्ञानी नाही - मी माणूस आहे, सर्वज्ञानी नाही. माझ्याबद्दलचे वाद कदाचित मी घेत असलेल्या जलद निर्णयांमुळे असतील, असं तुकाराम मुंढे म्हणाले.
जनतेसाठी एक पाऊल मागे घेण्यास तयार - जनतेसाठी एक पाऊल मागे घेण्यासाठी काहीच अडचण नाही. मी कधीही आडकाठी घातली नाही. संवाद साधण्यासाठी मी कमीपणा घेत नाही. महापौरांना मी स्वत: फोन करुन त्यांनी एका शाळेत चर्चेसाठी बोलावलं, त्या ठिकाणी जाऊन चर्चा केली.
बदल्यांचा विचार करत नाही - प्रशासकीय सेवेत रुजू होताना बदल्यांचा विचार नसतो. बदल्या किती होतात याचा विचार करत नाही, पण का होतात याचा विचार करेन. काही त्रुटी असतील तर त्या दूर करेन, असंही स्पष्टीकरण मुंढेंनी दिलं.
आकसबुद्धीने वागलो नाही - शहर-नागरिकांना सुविधा पुरवणं हे माझं काम आहे. मी कोणाविरोधातही आकसबुद्धीने वागलो नाही. माझ्याविरोधात कोण आकसबुद्धीने वागत असेल, तर त्याबाबतची मला कल्पना नाही, असं तुकाराम मुंढे यांनी नमूद केलं.
चूक असेल तर दाखवा - माझी चूक असेल तर दाखवा, चुका दुरुस्त करायलाच हव्या, चुका झाकून काम करणार नाही. मात्र मी काही चुकीचं केलं नाही, असा विश्वास तुकारा मुंढेंनी व्यक्त केला.
नियमाला धरुनच निर्णय - नवी मुंबईच्या नागरिकांसाठी आवश्यक ते सर्व निर्णय तातडीने घेतले. हे सर्व निर्णय नियमाला धरुनच घेतले. रस्त्यावरील फेरीवाल्यांवर आणि मनपाच्या जागेवर बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई केली, असंही तुकाराम मुंढेंनी सांगितलं.
वेळ देत नसल्याचा आरोप चुकीचा - मी वेळ देत नाही हा नगरसेवकांचा आरोप चुकीचा आहे. दर बुधवारी एक तास नगरसेवकांसाठी असतो. मी कोणालाही बसवून ठेवत नाही, असं तुकाराम मुंढे म्हणाले.
माझ्याविषयी गैरसमज पसरवले जात आहेत - माझ्याविषयी अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. अर्धवट माहितीवर आरोप करणं चुकीचं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -