निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील दहा महत्त्वाचे मुद्दे
10. नगरपालिका निवडणुकीत 10 कोटी रुपयांची दारु जप्त, 10 हजार जणांना तडीपार, दोन हजार जणांविरोधात फौजदारी कारवाई
9. नागपुरातील जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांना राज्य सरकारने नगर परिषद, नगर पंचायत घोषित केलं. कोर्टात चॅलेंज केल्यामुळे नागपुरातील जिल्हा परिषदेची निवडणूक वगळली
8. हॉटेल, रेस्टॉरंट यांनी आश्वासन दिलं, मतदान करणाऱ्यांना बिलावर सवलत मिळणार
7. महापालिकेसाठी 19 फेब्रुवारीला संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून प्रचारबंदी
6. महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी होते, ही शोभणारी बाब नाही. बँक, एनजीओ, कॉर्पोरेट कंपनी अशा सर्व माध्यमातून प्रसार करणार
5. निवडणूक झाल्यानंतर झालेला खर्च 30 दिवसाच्या आत निवडणूक आयोगाकडे जमा करावा
4. निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराने स्वतंत्र बँक खाते उघडायचं
3. 14 फेब्रुवारीपासून एक्झिट पोल घेण्यास बंदी
2. ज्या जिल्ह्यात महापालिका किंवा जिल्हा परिषद निवडणूक नाही तिथे विकासाचं काम करण्यावर बंधन नाही
1. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आतापासून आचारसंहिता लागू