शरद पवारांच्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीतील दहा महत्त्वाचे मुद्दे!
'एखाद्या नेत्यानं मराठा मोर्चाचे नेतृत्व केलेलं नाही'
'शिक्षण असूनही मराठा समाजातील तरुणांन नोकरीत संधी मिळत नाही'
प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली सामंजस्याची भूमिका घेतली याचा आनंद आहे. आठवलेंनी अशी भूमिका घ्यायला हवी होती
'वर्षानुवर्ष सत्ता भोगली हा शब्द आकसापोटी वापरला जातोय'
'सत्तेबाहेर असल्यानं अस्वस्थ असल्याचा आरोप चुकीचा आहे'
'मी काय आता राज्यकर्ता नाही. माझ्या हातात काही सत्ता नाही. जे राज्यकर्ते आहेत त्यांनी याप्रकरणी ठोस भूमिका घेऊन तात्काळ कृती करणं गरजेचं आहे.'
'राज्यकर्त्यांनी सहमत आहे असं म्हणून चालत नाही. त्यांनी कृती करण्याची गरज असते'
'केंद्रीय मंत्र्यांनी जबाबदारीनं वक्तव्य केलं पाहिजे. समस्या गंभीर असते तेव्हा विनोद किंवा काव्य करुन चालत नाही.'
'इतर राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळतं तर महाराष्ट्रात काही नाही?'
राज्यकर्ते शेतीबद्दल असंवेदनशील असल्यानं अनेक समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळेच अस्वस्थता हे मोर्चाचं मुख्य कारण आहे. असं पवार म्हणाले