✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

युरो कपमध्ये सर्वाधिक गोल झळकावणारे दहा फुटबॉलपटू

एबीपी माझा वेब टीम   |  17 Jun 2016 11:25 PM (IST)
1

झाल्टन इब्राहिमोविच (स्वीडन) - झाल्टन इब्राहिमोविच यंदा चौथ्यांदा स्वीडनकडून युरो कपमध्ये खेळताना दिसतोय. इब्राहिमोविचच्या नावावर 10 सामन्यांत सहा गोल जमा आहेत.

2

थिअरी ऑन्ऱी (फ्रान्स) - 2000 साली फ्रान्सला युरो कप जिंकून देण्यात थिअरी ऑन्ऱीनं मोलाचा वाटा उचलला होता. ऑन्ऱी 2000, 2004 आणि 2008 साली युरो कपमध्ये सहभागी झाला. ऑन्ऱीच्या खात्यात 11 सामन्यांत सहा गोल जमा आहेत

3

सावो मिलोसेविच (युगोस्लाविया )- युगोस्लावियाच्या सावो मिलोसेविचननं 2000 सालच्या युरो कपमध्ये चार सामन्यांत पाच गोल झळकावले आहेत.

4

रुड वान निस्टलरॉय (नेदरलँड्स) - नेदरलँड्सचा आणखी एक माजी फुटबॉलवीर ज्यानं युरो कपमध्ये आपल्या कामगिरीची छाप सोडली. रुड वान निस्टलरॉयच्या खात्यात आठ सामन्यांत सहा गोल जमा आहेत.

5

वेन रुनी (इंग्लंड)- इंग्लंडचा स्टार स्ट्रायकर वेन रुनी 2004, 2012 आणि 2016 अशी तीन वर्षे युरो कपमध्ये सहभागी झाला. युरो कपमध्ये रुनीच्या नावावर सहा सामन्यांत पाच गोल जमा आहेत.

6

ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) - पोर्तुगालचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं 2004, 2008 आणि 2012 अशा सलग तीन युरो कपमध्ये गोल झळकावले आहेत. यंदा त्याला युरो कपमध्ये सलग चौथ्या वर्षी गोल करण्याची संधी आहे. रोनाल्डोच्या नावावर 14 सामन्यांत सहा गोल जमा आहेत.

7

पॅट्रिक क्लावर्ट (नेदरलँड्स) - नेदरलँड्सचा माजी फुटबॉलवीर पॅट्रिक क्लावर्टनं 1996 आणि 2000 अशा दोन युरो कप स्पर्धेतल्या नऊ सामन्यांत मिळून सहा गोल झळकावले आहेत.

8

न्यूनो गोमेज (पोर्तुगाल)- न्यूनो गोमेजनं 2000, 2004 आणि 2008 अशी तीन वर्षे युरो कपमध्ये पोर्तुगालचं प्रतिनिधित्त्व केलं. गोमेजच्या खात्यात 14 सामन्यांत सहा गोल जमा आहेत

9

मिचेल प्लाटिनी (फ्रान्स) - फ्रान्सच्या मिचेल प्लाटिनी यांची जगातल्या सर्वोत्तम फुटबॉलर्समध्ये गणना केली जाते. प्लाटिनी हे केवळ एकदाच म्हणजे 1984 साली युरो कपमध्ये सहभागी झाले होते. मिचेल प्लाटिनी यांनी त्या स्पर्धेतल्या पाच सामन्यांत तब्बल नऊ गोल झळकावण्याचा पराक्रम गाजवला होता. आणि फ्रान्सला पहिल्यांदा युरो कपचं विजेतेपद मिळवून दिलं होतं.

10

अॅलन शेरर (इंग्लंड) - 1996च्या युरो कपमध्ये गोल्डन बूटचा पुरस्कार मिळवणारा अॅलन शेररच्या नावावर नऊ सामन्यांमध्ये सात गोल जमा आहेत.

11

फुटबॉलच्या दुनियेत विश्वचषकाखालोखाल सर्वात लोकप्रिय असलेली युरो कप स्पर्धा आता रंगात आलीय. फ्रान्समध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेच्या निमित्तानं अख्खा युरोप फुटबॉलमय झालाय. आपण पाहूयात युरो कपच्या इतिहासात सर्वात जास्त गोल कोणाच्या नावावर आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • युरो कपमध्ये सर्वाधिक गोल झळकावणारे दहा फुटबॉलपटू
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.