पुण्यात अवतरला गवा, रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी पण जीव वाचवण्यात अपयश
एबीपी माझा वेब टीम | 09 Dec 2020 05:39 PM (IST)
1
गव्याला पकडताना त्याला बेशुध्द करण्यात आलं आणि त्याचे चारही पाय बांधण्यात आले.
2
अतिउत्साही लोकांनी गव्याचा पाठलाग कर करून, मोठ्यानं ओरडून त्याला घाबरवून सोडलं. नंतर त्याला बेशुद्ध अवस्थेच नेण्यात आलं. मग झोपेतच त्या गव्यानं आपले प्राण सोडले.
3
या गव्याला पकडताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांची मोठी धावपळ झाली. सुमारे तासभर वन अधिकारी या गव्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते.
4
लोकांची गर्दी पाहून गवा बिथरला. त्याने बाजूला असलेल्या गाडीला जबरदस्त धडक दिली.
5
6
सुरुवातीला लोकांना ती गाय असावी असं वाटलं. पण तो गवा असल्याचे समजताच लोकांत एकच गोंधळ उडाला.
7
पुण्याच्या कोथरुडमध्ये महात्मा सोसायटीच्या परिसरात सकाळी गवा दिसून आला.