In Pics : चित्रपटांसाठी कोट्यावधी रुपये घेणाऱ्या कलाकारांची पहिली कमाई ऐकून व्हाल थक्क
बॉलीवूडमध्ये अनेक सुपरस्टार आहेत. आज त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. आज एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये मानधन घेणाऱ्या या अभिनेत्यांच्या करिअरच्या सुरुवातीची किती कमाई होती हे जाणून घेऊया.
हृतिक रोशनची पहिली कमाई 100 रूपये होती. या पैशांनी ऋतिकने टॉय ट्रेन खरेदी केली होती. ऋतिकने 'आशा' या चित्रपटात बालकलाकाराची भूमीका केली होती.
अभिनेता इरफान खान ट्यूशनमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करत होते. मीडिया रिपोर्टसनुसार इरफान पहिली कमाई 25 रूपये होती. इरफानने या पैशातून सायकल खरेदी केली होती.
कल्की केकला लंडन मधील एका हॉटेलमध्ये वेट्रेसचा पार्ट टाईम जॉब करत होते. या पैशांनी कल्की आपल्या कॉलेजची फी भरत होती.
बॉलीवूडचा किंग शाहरुख खानची पहिली कमाई 50 रूपये होती. शाहरूखला पंकज उदासच्या कॉन्सर्टमध्ये पैसे मिळाले होते. या पैशातून शाहरूख आग्रा फिरायला गेला होता.
आमिर खानची पहिली कमाई 1000 रूपयांच्या जवळपास होती. आमिर खानने हे पैसे आपल्या आईला दिले होते.