Varun-Natsha Wedding | आली लग्न घटीका समीप! बालमैत्रिणीशी लग्नगाठ बांधणार वरुण धवन, पाहा खास फोटो
लग्नसमारंभात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांनी कोरोना टेस्ट करुन यावं, असं दोन्ही कुटुंबियांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
नताशा आणि वरुण एक सीक्रेट वेडिंग करत आहेत.
नताशा स्वतः एक फॅशन डिझायनर आहे. नताशा आणि वरुणने आपल्या लग्नासोहळ्यासाठी नो फोन पॉलिसी तयार केली आहे.
दरम्यान, नताशा लग्नासाठी स्वतः डिझाइन केलेला लेहेंगा वेअर करणार आहे.
त्याचसोबत एक आणखी फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये वरुण त्याच्या मित्रमंडळींसोबत धमाल करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
लग्नसोहळ्यातील मेहंदीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये वरुण धवन धमाल करताना दिसत आहे. फोटोंमध्ये बॉलिवूडची मेहंदी आर्टिस्ट वीना आपल्या आईसोबत दिसून येत आहे.
नताशा आणि वरुण धवन यांचा लग्नसोहळा अलिबागच्या सासवने परिसरात 'द मेन्शन हाऊस'मध्ये पार पडणार आहे.
लग्नापूर्वीच्या सर्व सोहळे पार पडले आहेत. लग्नात वरुण धवनचे वडील डेविड धवन यांनी प्रायव्हसीची काळजी घेतली आहे.
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आज आपला लहानपणीची मैत्रिण आणि सक्सेसफुल फॅशन डिझायनर नताशा दलाल सोबत लग्नगाठ बांधणार आहे. चाहते लग्न आणि लग्नसमारंभांचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच वरुण-नताशाच्या लग्नाच्या ठिकाणचे काही इनसाइड फोटो समोर आले आहेत.