PHOTO: उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्यानं मोठं नुकसान, 150 लोक बेपत्ता झाल्याची भीती
पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि बचाव कार्याचा आढावा घेतला.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात जोशीमठपासून 25 किमीवर पैंग या ठिकाणी एक मोठा हिमकडा कोसळला आहे. त्यामुळे धौली नदीला पूर आला आहे. गंगा पॉवर प्रोजेक्टचं मोठं नुकसान झालं आहे.
धौली नदीच्या पुरामुळे अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे. प्रशासन घटनास्थळी पोहोचलं असून मदत व बचावकार्य सुरु झालं आहे.
रेणी गावाजवळील धौलीगंगा येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे.पाणी पातळी वाढल्याने अनेक नदीकाठची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. आयटीबीपीचे शेकडो कर्मचारी बचावासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.
धौली नदीच्या किनारी राहणाऱ्या लोकांना त्या परिसरातून शक्य तितक्या लवकर निघून जाण्यासाठी सांगितलं असून त्या ठिकाणी हाय अलर्ट जारी केला आहे.
अचानक बांध तुटल्याने गंगा पॉवर प्रोजेक्टमध्ये काम करणारे 150 कर्मचारी बेपत्ता झाले असल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. आतापर्यंत दोघांचे प्रेत हाती लागले आहे.