अमेरिकेच्या जंगलांमध्ये भीषण आग, आतापर्यंत शेकडो घरं आगीच्या भक्षस्थानी
आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आग असून आतापर्यंत या आगीमुळे सर्वाधित नुकसान झालं असल्याचं ओरेगनच्या गव्हर्नर केट ब्राउन यांनी जाहीर केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआग विझवण्यासाठी जवळपास 14 हजार फायर फायटर्स काम करत आहेत. त्यांच्या मदतीसाठी 60 हून अधिक हेलिकॉप्टर काम करत आहेत. परंतु, ताशी 40 ते 50 किलोमीटरने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आग विझवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.
जंगलात वेगाने पसरणाऱ्या आगीमुळे लोकांच्या चिंतेत भर पडत आहे. आग इतक्या वेगाने पसरत आहे की, या भागांतील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासही वेळ मिळाला नाही.
या भयानक घटनेत आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 5 लाख लोक बेघर झाले आहेत.
आग जवळपास 24 किलोमीटर प्रति दिनच्या वेगाने पसरत आहे. सॅन फ्रांसिस्कोतील उत्तर पूर्व येथे असेल्या प्लुमास नेशनल फॉरेस्टमध्ये लागलेली आग बुधवारी फक्त एकाच दिवसांत 40 किलोमीटरमध्ये पसरली आहे. आतापर्यंत जवळपास 1.036 वर्ग किलोमीटर क्षेत्र आगीच्या भक्षस्थानी आलं आहे.
सॅन फ्रांसिस्कोच्या उत्तरपूर्व भागांत लागलेली आग, येथे राहणाऱ्या अनेक समुदायांना धोकादायक ठरत आहे. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसोबत जवळपास 25 मैल क्षेत्रफळ या आगीत राख झालं आहे.
अनेक घरं आगीच्या भक्षस्थानी आली आहेत. कॅलिफोर्नियातील सिएरा नॅशनल फॉरेस्टमध्ये गेल्या आठवड्यात आग लागली होती. ज्यामध्ये अनेक मजदूर सुट्ट्यांमध्ये जंगलात कॅपिंगसाठी गेले होते. परंतु, आग लागल्यामुळे ते तिकडेच अडकले. त्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं होतं.
अमेरिकेतील पॅसिफिक नॉर्थवेस्टमधील जंगलांमध्ये भीषण आग लागली असून ही आग वेगाने पसरत आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत त्यांनी एवढ्या वेगाने आग पसरताना पाहिली नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -