Unlock 1 | मंदिर, मशिद, चर्च, गुरुद्वाराची दारं खुली!
जवळपास 80 दिवसांनंतर आज (8 जून) देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ख्याती असलेलं तिरुपती बालाजी मंदिर उघडलं आहे.
भगवान शंकराच्या 12 ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेलं सोमनाथ मंदिर सध्या फक्त स्थानिक भाविकांसाठीच खुलं केलं आहे.
लॉकडाऊननंतर उत्तर प्रदेशच्या लखनौमधील मणकेश्वर मंदिर दोन महिन्यांनी आज (8 जून) खुलं झालं. (ANI Photo)
उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे असलेलं बडे हनुमान मंदिरही दोन महिन्यांनी भाविकांसाठी उघडण्यात आलं. (ANI Photo)
अनलॉक 1.0 मध्ये नियमांमध्ये काहीशी शिथिलता मिळाल्यानंतर दिल्लीतील जामा मशिदही खुली झाली आहे.
अनलॉक 1.o मध्ये नियम शिथिल झाल्यानंतर दिल्लीतील कलकजी मंदिर पुन्हा उघडण्यात आलं. (ANI Photo)
शक्तिपीठांपैकी एक असलेलं उत्तर प्रदेशातील मां अलोपी देवी मंदिरही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत सुरु झालं. (ANI Photo)
मथुरामधील श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिर भाविकांसाठी खुलं झाल्यानंतर इथे लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत. (ANI Photo)
मंदिरांसोबतच लखनौमधील कॅथड्रल चर्चही खुलं झालं. (ANI Photo)
याशिवाय लखनौमधील यहियागंज गुरुद्वाराही सोशल डिस्टन्सिंग पाळत उघडण्यात आला. (ANI Photo)
सोशल डिस्टन्सिंग पाळत दिल्लीतील साई बाबा मंदिर भाविकांसाठी उघडलं. (ANI Photo)