तुकाराम महाराजांच्या पालखीचं मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत देहू वरुन प्रस्थान
देहू येथील तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं आज मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थान झालं आहे.
एरवी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस असायचे, पण यावर्षी वारीत वारकऱ्यांना सोशल डिस्टंसिंग सांगण्यासाठी पोलीस होते.
वारीत अधिकचे वारकरी सहभागी होऊ नयेत म्हणून त्याचं लक्ष होतं.
रोज शासनाच्या नियमांनुसार भजन-कीर्तन होईल. दशमीला तुकोबारायांच्या पादुका वाहनानं पंढरपूरला पाच वारकरी घेऊन जातील.
आज वारीमध्ये सहभागी झालेला प्रत्येक वारकरी ज्ञानोबा-तुकाराम या गजरासोबतच एक मागणी करत असेल ती म्हणजे हे कोरोनाचं संकट दूर होऊ दे आणि पुढच्या वर्षी तरी वारीची परंपरा उत्साहात आणि आनंदात साजरी होऊ देत.
आता दशमीपर्यंत तुकाराम महाराजांची पालखी देहूच्या मंदिरात मुक्कामी असेल.
तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील हजारो वारकरी सहभागी होतात.
मंदिराचंही निर्जुंतिककरण करण्यात आलं असून कुणी कुठे थांबावं या साठी आखणी करण्यात आली होती.