आश्रम वेबसिरीजमध्ये बॉबी देओलसोबत बोल्ड सीन दिल्यानंतर अभिनेत्रीचा खुलासा, 'त्या' सीनचे शूटिंग कसे केले?
बॉलिवूडची तरूण आणि प्रतिभावान अभिनेत्री त्रिधा चौधरी तिच्या यशस्वी कारकीर्दीमुळे खूप खुश आहे. वेबसिरीज आश्रमा मध्ये बबिताजींच्या भूमिकेमुळे ती सध्या चर्चेत आहे. (Pic credit: Instagram)
अलीकडेच एका मुलाखतीत त्रिधाने तिच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल सांगितले होते. यात, आश्रमा या वेबसिरीजमध्ये बॉबी देओलसोबत दिलेल्या इंटिमेट दृश्यांवरही खुलेपणाने चर्चा केली. (Pic credit: Instagram)
आपण केवळ पडद्यावर अशा भूमिका साकारतो, हे लोकांना समजत नसल्याचे त्रिधा म्हणाली. असं काही प्रत्यक्षात घडत नाही. हे दृष्य प्रत्यक्षात कसे शूट होतात याचीही लोकांना माहिती नाही. (Pic credit: Instagram)
त्रिधाने मुलाखतीत सांगितले की उशीच्या मदतीने हे दृष्य शूट केलं असून शूटिंग दरम्यान सेटवर बरेच लोक उपस्थित होते. (Pic credit: Instagram)
अभिनेता बॉबी देओलचे कौतुक त्रिधा म्हणाली की तो विवाहित आहे. शूट दरम्यान त्यांनी मला अस्वस्थ होऊ दिले नाही आणि मी नर्व्हस देखील झाली नाही.(Pic credit: Instagram)
मी देवाचे आभार मानते की थोड्या वेळातच मला इतके यश मिळाले. यासाठी ओटीटी व्यासपीठाचेही आभार. डिजीटल प्लटफॉर्ममुळे तिच्या वयाच्या मुलींना बरीच कामे मिळू लागली असल्याची माहिती त्रिधाने दिली. (Pic credit: Instagram)
'आश्रमा'साठी माझं ऑडिशन झालं नसून प्रकाश झा यांनी माझे मागील काम पाहिले आणि त्या आधारावर, बबिताची भूमिका करण्यासाठी निवड केल्याचे त्रिधाने सांगितले. (Pic credit: Instagram)
त्रिधा माधुरीची खूप मोठी फॅन आहे. माधुरीने ज्या पद्धतीने आपले जीवन संतुलित केले आहे, ते कौतुकास्पद आहे. ती स्वत: एक ब्रँड बनली आहे, त्रिधालासुद्धा स्वत:ला ब्रँड म्हणून प्रस्थापित करायचं आहे. (Pic credit: Instagram)