Most Searched Personalities 2020 : गुगलवर 2020 मध्ये सर्वाधिक सर्च केल्या 'या' 10 व्यक्ती
जो बायडन : अमेरिकन राष्ट्रपती जो बायडन यांचे नाव यादीत प्रथम क्रमांकावर आहे. भारतात बायडन यांना सर्वात जास्त सर्च केले गेले. निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यातील लढत चुरशीची झाली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअर्णब गोस्वामी : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी हे देखील या वर्षात अनेक कारणांमुळे चर्चेत होते. गोस्वामी हे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून जो बायडन यांच्यानंतर भारतीयांनी अर्णब गोस्वामी यांना सर्च केले आहे.
कनिका कपूर : लॉकडाऊनपूर्वी बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झालेली कनिका ही पहिली बॉलिवूड सेलिब्रिटी होती. त्यामुळे कनिकाला गुगलवर जास्त सर्च करण्यात आले.
किम जोंग उन : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनबाबत यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे चर्चांना उधाण आलं होत. किम जोंग उनच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी जगभरात जेवढी उत्सुकता होती तेवढी भारतामध्ये देखील होती. त्यामुळे या कालावधीत किम जोंग उन यांना भारतात सर्च करण्यात आले.
अमिताभ बच्चन : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना नेहमीच त्यांचे चाहते सर्च करत असतात. या वर्षी ते या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्वात जास्त सर्च करण्यात आले.
रशीद खान : अफगाणिस्तानचा गोलंदाज रशीद खान याच्या गोलंदाजीचे जगभरात चाहते आहे. भारतात देखील त्याचे चाहते असून त्याच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न चाहत्यांनी केला.
रिया चक्रवर्ती : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेण्ड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सर्वात जास्त सर्च करण्यात आले.
कमला हॅरिस : संपूर्ण जगाचं लक्षं लागलेल्या अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकांकडे होतं. या निवडणुकीत पहिल्यांदाच अमेरिकेला एक महिला उपराष्ट्रपती मिळाल्या आहेत. हॅरिस यांच्या आईचा जन्म भारतात तामिळनाडू येथे झाला आहे. त्यामुळे भारतात त्यांना सर्च करण्यात आले.
अंकिता लोखंडे : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतक त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला सर्वात जास्त सर्च करण्यात आले. अंकिता लोखंडे आणि सुशांत हे रिलेशनशिपमध्ये होते. जवळपास सहा वर्षं हे नातं जपल्यानंतर सुशांत तिच्यापासून वेगळा झाला होता.
कंगना रनौत : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री कंगना रनौत कायमच चर्चेत असते. समाजात घडलेल्या कोणत्याही घटनेवर ती कायम उघडपणे व्यक्त होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -