सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीची पोलिसांकडून 11 तास चौकशी

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने ब्रांद्रा येथील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. परंतु, त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, पाटाणामध्ये सुशांत सिंह राजपूतचं अस्थी विसर्जन करण्यात आलं आहे. सुशांतच्या वडिलांनी त्याच अस्थि विसर्जन केलं. (Photo Credit:Manav Manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पोलीस स्टेशनमधून बाहेर पडतानाचे हे रियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)

सकाळी अकराच्या दरम्यान पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या रियाला रात्री दहाच्या दरम्यान पोलिसांनी घरी सोडले. (Photo Credit: Manav Manglani)
रियाकडे तब्बल अकरा तास चौकशी पोलिसांनी केली. त्याच बरोबर सुशांत सिंहच्या दोन माजी सेक्रेटरीचा ही जबाब नोंदविण्यात आला आहे. (Photo Credit : Manav Manglani)
रिया आणि सुशांत गेल्या काहि दिवसांपासून रिलेशनमध्ये असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यामुळेच सुशांतच्या आत्महत्येचं कोडं उलगडण्यासाठी रियाचा जबाब अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे. (Photo Credit : Manav Manglani)
बॉलीवुड अभिनेत्री रिया चक्रवतीने अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आपला जवाब नोंदवला आहे. वांद्रे पोलिसांकडून तब्बल 11 तास तिची चौकशी करण्यात आली. (Photo Credit: Manav Manglani)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -