एक्स्प्लोर
सचिनची सारा आता देशाबाहेरही सुपरस्टार! 13 कोटी डॉलर्सच्या प्रकल्पाची बनली 'ब्रँड अॅम्बेसेडर'
SARA TENDULKAR : या मोहिमेचे नाव ‘कम अँड से जी-डे’ असून, यासाठी भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर हिला भारतातील ब्रँड अॅम्बेसडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
SARA TENDULKAR
1/12

ऑस्ट्रेलिया सरकार लवकरच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक विशेष पर्यटन मोहीम सुरू करणार आहे.
2/12

या मोहिमेचे नाव ‘कम अँड से जी-डे’ असून, यासाठी भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर हिला भारतातील ब्रँड अॅम्बेसडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
3/12

ही मोहीम सुमारे 13 कोटी डॉलर्स खर्चाची आहे.
4/12

ऑस्ट्रेलियामध्ये सुट्ट्या घालवण्यासाठी आणि तेथील पर्यटन अनुभवण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांना प्रोत्साहित करणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
5/12

या मोहिमेची सुरुवात 7 ऑगस्टपासून चीनमध्ये होणार आहे. त्यानंतर वर्षाअखेरीस ही मोहीम भारत, अमेरिका, ब्रिटन अशा प्रमुख देशांमध्येही सुरू करण्यात येणार आहे.
6/12

‘कम अँड से जी-डे’ ही मोहिमेची दुसरी आवृत्ती आहे. यापूर्वी ही मोहीम ऑक्टोबर 2022 मध्ये प्रथमच सुरू करण्यात आली होती.
7/12

येत्या दोन वर्षांपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून, ऑस्ट्रेलिया सरकारने 2022 पासून आतापर्यंत एकूण 25 कोटी डॉलर्स या अभियानासाठी गुंतवले आहेत.
8/12

भारतामध्ये जेव्हा ही मोहीम अधिकृतपणे सुरू केली जाईल, तेव्हा सारा तेंडुलकर हिचा चेहरा या मोहिमेचे प्रतिनिधित्व करणार आहे.
9/12

अमेरिकेमध्ये, प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन वाइल्डलाइफ कन्झर्वेशनिस्ट स्टीव्ह इर्विन यांचा मुलगा रॉबर्ट इर्विन या अभियानाचा चेहरा असणार आहे.
10/12

ब्रिटनमध्ये, ख्यातनाम खाद्यलेखिका आणि टीव्ही शेफ निजेला लॉसन यांची निवड करण्यात आली आहे.
11/12

या मोहिमेंतर्गत, संबंधित देशांमध्ये पर्यटन वाढवण्यासाठी तिथल्या लोकप्रिय आणि विश्वासार्ह व्यक्तींना ब्रँड अॅम्बेसडर म्हणून सहभागी करून घेतले जात आहे.
12/12

चीनमध्ये, सुप्रसिद्ध अभिनेता योश हू, तर जपानमध्ये, प्रसिद्ध मीडिया व्यक्तिमत्व आणि विनोदी कलाकार अबेरेरु-कुन हे या मोहिमेचे प्रतिनिधी असतील.
Published at : 04 Aug 2025 03:22 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
मुंबई
महाराष्ट्र
कोल्हापूर


















