Rohit Virat Playing International Cricket : ‘2027 चा वर्ल्डकप खेळायचा असेल तर...’ रोहित अन् विराट समोर अल्टीमेट!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी नुकताच टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला.
Continues below advertisement
Rohit Virat Playing International cricket
Continues below advertisement
1/10
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी नुकताच टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला.
2/10
या संघात मोठा बदल करत बीसीसीआयने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेत शुभमन गिलला नवीन कर्णधार म्हणून नेमलं आहे.
3/10
त्यानंतर बीसीसीआयने आणखी एक मोठा निर्णय घेतला असून विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूंना आता देशांतर्गत स्पर्धा खेळणं बंधनकारक केलं आहे.
4/10
मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी स्पष्ट संकेत दिले की, जेव्हा हे खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी उपलब्ध नसतील, तेव्हा त्यांना विजय हजारे ट्रॉफीसारख्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळावं लागेल.
5/10
जेव्हा अजित आगरकरांना विचारण्यात आलं की कोहली आणि रोहितला निवडीसाठी विजय हजारे ट्रॉफी खेळणं आवश्यक आहे का, तेव्हा त्यांनी ठामपणे उत्तर दिलं की, "मला वाटतं की आम्ही एक किंवा काही वर्षांपूर्वी हे स्पष्ट केलं होतं की जेव्हा जेव्हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते नसले, तेव्हा त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळावं."
Continues below advertisement
6/10
हा निर्णय बीसीसीआयने यंदाच्या जानेवारी महिन्यात घेतलेल्या आदेशाशी सुसंगत आहे, ज्यामध्ये सर्व उपलब्ध खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होणं अनिवार्य करण्यात आलं होतं.
7/10
गेल्या दशकभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यस्त असलेले विराट कोहली आणि रोहित शर्मा आता या नियमाला अपवाद राहणार नाहीत.
8/10
36 वर्षांचा विराट कोहली आणि 38 वर्षांचा रोहित शर्मा सध्या केवळ वनडे फॉरमॅटमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी टेस्ट आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
9/10
आगरकर यांनी स्पष्ट केलं की, 2027 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या दृष्टीने हे बदल आवश्यक आहेत. रोहित शर्मा यांच्याकडून अलीकडेच वनडे कर्णधारपद काढून घेत शुभमन गिलला जबाबदारी देण्यात आली आहे.
10/10
बीसीसीआयचं मत आहे की खेळाडू कितीही मोठे असले तरी त्यांनी देशांतर्गत क्रिकेटद्वारे आपली फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करायला हवी. हा निर्णय भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी घेतलेलं एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
Published at : 06 Oct 2025 04:30 PM (IST)