एक्स्प्लोर
Yuzvendra Chahal and RJ Mahvash: युझवेंद्र चहल अन् आरजे महावशचं पहिलं संभाषण काय?; तुम्हालाही बसणार नाही विश्वास!
Yuzvendra Chahal and RJ Mahvash: युझवेंद्र चहल आणि आरजे महावश एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
Yuzvendra Chahal and RJ Mahvash
1/8

भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची कथित गर्लफ्रेंड आरजे महावश सध्या चर्चेत आहेत.
2/8

युझवेंद्र चहल आणि आरजे महावश एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. याचदरम्यान दोघांमध्ये पहिलं संभाषण कसे सुरु झाले?, याची माहिती आता स्वत: महावशने दिली आहे.
3/8

आरजे महावशने युझवेंद्र चहलसोबत एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने 'Talented Man' असंही म्हटलं आहे.
4/8

युझवेंद्र चहल सध्या पंजाब किंग्स संघाकडून आयपीएल खेळत आहे. अनेक सामन्यात महावश युझवेंद्र चहलला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उपस्थित राहिल्याचे दिसले.
5/8

युझवेंद्र चहल आणि आरजे महावश पंजाब संघाच्या बसमध्ये एकत्र प्रवास करतानाही समोर आले.
6/8

आता महावशचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती चहलचे नाव न घेता म्हणतेय की, एक माणूस आहे जो मला मेसेज करतो आणि म्याऊ... म्याऊ...तु मला खूप आवडतेस...असं म्हणतो. चहल आणि महावश यांच्यातील हेच पहिले संभाषण होते, असंही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
7/8

महावशने सांगितले की, जेव्हा ती तिच्या मित्रांसोबत घरी पार्टी करते तेव्हा ही व्हॉइस नोट ऐकून ते खूप हसतात. त्याने सांगितले की त्या माणसाचा म्याऊ म्याऊ करणारा मेसेज कधीही येतो.
8/8

आरजे महावशने थेटपण चहलचं नाव घेतलेलं नाही. पण नेटकऱ्यांनी तो चहलच मेसेज पाठवत असणार असं म्हटलं आहे.
Published at : 22 Apr 2025 07:58 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























