RR vs RCB : राजस्थान विरुद्ध बंगळुरुनं जर्सीचा रंग का बदलला? RCB चा कॅप्टन रजत पाटीदार म्हणाला...
RCB vs RR : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना सुरु आहे. राजस्थाननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 173 धावा केल्या आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
1/5
आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मॅच सुरु आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये मॅच सुरु आहे. राजस्थाननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 4 बाद 173 धावा केल्या आहेत.
2/5
आरसीबीला विजयासाठी 174 धावा कराव्या लागणार आहेत. आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी चांगली सुरुवात करुन दिली आहे.
3/5
विशेष बाब म्हणजे आरसीबीचे खेळाडू आज लाल रंगाच्या जर्सी ऐवजी हिरव्या रंगाच्या जर्सीत मैदानावर उतरल्याचं पाहायला मिळालं. स्टेडियममध्ये मिळालेल्या पॉलिस्टर वेस्ट आणि कापडाच्या एकत्रीकरणातून बनवण्यात आल्या आहेत. या जर्सीची निर्मिती पुमा रीफायबर पॅब्रिककडून बनवण्यात आल्या आहेत.
4/5
आरसीबीचा संघ आयपीएलच्या प्रत्येक हंगामात एका सामन्यात ग्रीन जर्सी परिधान करुन मॅच खेळतो. पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी ग्रीन जर्सी घालून संघ मैदानात उतरतो.
5/5
आरसीबीकडून गो ग्रीन अभियानाची सुरुवात 2011 पासून करण्यात आली आहे. ग्लोबल वॉर्मिंगबाबत लोकांना जागरुक करण्याचं हे एक पाऊल आहे. आरसीबीकडून सातत्यानं पर्यावरण संवर्धानासाठी जागरुकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. रजत पाटीदार यांनं अधिक झाडं लावण्यासाठी जागरुकता वाढवण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं.
Published at : 13 Apr 2025 06:07 PM (IST)