एक्स्प्लोर
RCB vs KKR मॅच पावसामध्ये वाहून गेली, BCCI चा बंगळुरु-हैदराबाद लढतीबाबत मोठा निर्णय, विराटच्या चाहत्यांचं स्वप्न अपूर्ण राहणार
IPL 2025 : कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील मॅच पावसामुळं रद्द करावी लागल्यानंतर बीसीसीआयनं मोठा निर्णय घेतला आहे.
आरसीबी हैदराबाद मॅचबाबत मोठा निर्णय
1/5

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. बीसीसीआयनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या एका मॅचचं ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
2/5

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील 23 मे रोजी होणारी मॅच लखनौच्या एकाना स्पोर्टस स्टेडियमवर होणार आहे.
3/5

बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील मॅच पावसामुळं रद्द झाली. यामुळं कोलकाता नाईट रायडर्सला नुकसान सहन करावं लागलं. ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले.
4/5

आरसीबीनं कोलकाता आणि बंगळुरु यांच्यातील मॅचच्या तिकिटांची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसामुळं पुढील सामना रद्द करावा लागू नये म्हणून बीसीसीआयनं मोठा निर्णय घेतला आहे.
5/5

विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी बंगळुरुतील सामन्यासाठी कसोटी क्रिकेटची जर्सी परिधान करुन चिन्नास्वामी स्टेडियमवर हजर राहण्याचा संकल्प केला होता. मात्र, बंगळुरु आणि कोलकाता सामना रद्द झाला. आता दुसरा सामना लखनौला हलवण्यात आल्यानं विराटच्या चाहत्यांचं स्वप्न अपूर्ण राहणार आहे.
Published at : 20 May 2025 06:32 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
कोल्हापूर
मुंबई
राजकारण


















