IPL 2025 Mumbai Indians: सामन्याच्या पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट्स घेणारा मुंबई इंडियन्सचा गोलंदाज; झहीर खानलाही टाकले मागे
IPL 2025 Mumbai Indians: अनुभवी गोलंदाज झहीर खानने पहिल्याच षटकांत 12 विकेट्स घेतल्या आहेत. झहीर खानने 2017 मध्ये आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली.

IPL 2025 Mumbai Indians
1/7
IPL 2025 Mumbai Indians: आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात दीपक चहरने त्याच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. दीपक चहरने पहिल्याच चेंडूवर जेक फ्रेझर मॅकगर्कला बाद केले. त्याच्या आधीही आयपीएल सामन्यांमध्ये गोलंदाजांनी डावाच्या पहिल्याच षटकांत विकेट घेतल्या आहेत.
2/7
न्यूझीलंडचा दिग्गज गोलंदाज ट्रेंट बोल्टने आयपीएल सामन्याच्या पहिल्याच षटकांत 31 विकेट्स घेतल्या आहेत. ट्रेंट बोल्टने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 126 विकेट्स घेतल्या आहेत.
3/7
भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकांत 27 विकेट्स घेतल्या आहेत. भुवनेश्वर आयपीएल 2025 मध्ये आरसीबीकडून खेळत आहे आणि त्याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत 187 विकेट्स घेतल्या आहेत.
4/7
स्विंगकिंग प्रवीण कुमारने आयपीएल सामन्याच्या डावाच्या पहिल्याच षटकात 15 विकेट्स घेतल्या. प्रवीण कुमारने 2017 नंतर एकही आयपीएल सामना खेळलेला नाही.
5/7
दीपक चहरने पहिल्याच षटकात 14 विकेट्स घेतल्या आहेत. चहरने आयपीएलमध्ये 82 विकेट्स घेतल्या आहेत आणि या हंगामात दीपक चहर मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे.
6/7
संदीप शर्माने पहिल्याच षटकांत 13 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या संदीपने त्याच्या कारकिर्दीत 142 विकेट्स घेतल्या आहेत.
7/7
अनुभवी गोलंदाज झहीर खानने पहिल्याच षटकांत 12 विकेट्स घेतल्या आहेत. झहीर खानने 2017 मध्ये आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली.
Published at : 14 Apr 2025 06:54 AM (IST)