Ind vs UAE Asia Cup : 'टीम इंडियाविरुद्ध सामना आम्हाला मोठा वाटत नाही...' यूएईचा कर्णधार मुहम्मद वसीम याचे मॅच आधी मोठे वक्तव्य
Ind vs UAE Asia Cup : आज दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आशिया कप 2025 मध्ये भारत विरुद्ध यूएई सामना रंगणार आहे. यूएईच्या कर्णधाराची सामन्याविषयी सर्वात पहिली प्रतिक्रिया, जाणून घ्या...

Asia cup 2025
1/8
आज दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आशिया कप 2025 मध्ये भारत विरुद्ध यूएई असा सामना रंगणार आहे.
2/8
हा सामना सुरु होण्याआधी यूएईचा कर्णधार मुहम्मद वसीम याने मोठे वक्तव्य केले.
3/8
भारत सोबत सामना खेळण्याआधीच कर्णधार मुहम्मद वसीमने "आम्ही या सामन्याला मोठी मॅच मनात नाही. करण सर्वच टीम खूप मोठ्या आणि दिग्गज आहेत, म्हणून सर्व मॅच आम्हाला सारख्याच वाटत आहेत, आम्ही जी मेहनत करत आहोत त्याच्या बळावर आम्ही पुढे जाऊ.भारत सोबत सामना खेळण्याआधीच कर्णधार मुहम्मद वसीमने "आम्ही या सामन्याला मोठी मॅच मनात नाही. करण सर्वच टीम खूप मोठ्या आणि दिग्गज आहेत, म्हणून सर्व मॅच आम्हाला सारख्याच वाटत आहेत, आम्ही जी मेहनत करत आहोत त्याच्या बळावर आम्ही पुढे जाऊ.
4/8
तो पुढे म्हणाला की, आम्ही इकडे भरपूर क्रिकेट खेळतो, भारत आणि पाकिस्तान सुद्धा इथे खूप क्रिकेट सामने खेळतात, पण हे आमचे होम ग्राउंड आहे तर याचा आम्ही पुरेपूर फायदा करून घेऊ."
5/8
यूएईने गेल्या एका वर्षात 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्यांचा परफॉर्मन्स हा खूप चांगला आहे,
6/8
या टीमने 26 पैकी 20 मॅच मध्ये बाजी मारली आणि बाकी 6 सामन्यात त्यांचा पराभव झाला.
7/8
आशिया कपमध्ये सुरुवातीच्या ट्राय सिरीज मध्ये यूएईने अफगाणिस्तान आणि पाकिस्तान विरोधात मॅच जिंकली नाही.
8/8
आशिया कप टी-20 मध्ये यूएईने 7 सामने खेळले त्यामध्ये 3 मॅच जिंकण्यात आल्या आणि 4 मॅच जिंकण्यात यश मिळवता आलं नाही.
Published at : 10 Sep 2025 05:04 PM (IST)