Yuvraj Singh : टकीला दारूच्या धंद्यात युवराज सिंगची एंट्री; नवा ब्रँड बाजारपेठेत धुमाकूळ घालणार
माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने नवी इनिंग सुरू केली आहे.

Yuvraj Singh alcohol industry
1/9
माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने नवी इनिंग सुरू केली आहे.
2/9
युवराज सिंगने अल्ट्रा-प्रीमियम स्पिरिट्स ब्रँड फिनो टकीला लाँच करण्यासाठी काही उद्योगपतींसोबत भागीदारी केली आहे.
3/9
युवराज सिंगचा हा ब्रँड सध्या अमेरिकन बाजारात लाँच करण्यात आला आहे.
4/9
अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या एका खास कार्यक्रमात युवराज सिंगचा हा ब्रँड लाँच करण्यात आला.
5/9
युवराज सिंगनेही सोशल मीडियावर काही फोटो शेअर करून ही माहिती दिली.
6/9
युवराज सिंगची गणना भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूंमध्ये केली जाते.
7/9
2007 च्या टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
8/9
वयाच्या 19 व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या युवराजने जवळजवळ 17 वर्षे भारतासाठी क्रिकेट खेळले. त्याने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
9/9
युवराज सिंगने टीम इंडियासाठी एकूण 40 कसोटी, 304 एकदिवसीय आणि 58 टी-20 सामने खेळले. या काळात त्याने 11778 धावा केल्या आणि 148 विकेट्सही घेतल्या.
Published at : 13 Feb 2025 08:55 AM (IST)