WTC Latest Points Table: भारत, इंग्लंड OUT...ऑस्ट्रेलियाचा सलग 3 कसोटी सामन्यात विजय, WTC च्या Points Table मध्ये उलथापालथ
WTC Latest Points Table: 2025-27 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत, ऑस्ट्रेलियाने आतापर्यंतचे सर्व सहा सामने जिंकले आहेत.

WTC Latest Points Table
1/6
WTC Latest Points Table: ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीच्या अंतिम दिवशी भेदक मारा करताना इंग्लंडचा 82 धावांनी पराभव केला. या शानदार विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेत अॅशेसवर कब्जा केला. 435 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 352 धावांवर संपुष्टात आला.
2/6
ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेच्या गुणतालिकेत उलथापालथ झाला आहे. तर भारत आणि इंग्लंडसारखे संघ जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर गेल्याचं दिसून येत आहे.
3/6
2025-27 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत, ऑस्ट्रेलियाने आतापर्यंतचे सर्व सहा सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाची विजयाची गुण टक्केवारी 100 टक्के आहे. तर दक्षिण अफ्रिकेचा संघा 75 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
4/6
न्यूझीलंड आणि श्रीलंका अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. तर पाकिस्तानचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.
5/6
2025-27 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुणतालिकेत भारत सहाव्या स्थानावर आहे. भारताची गुणांची टक्केवारी फक्त 48.15 आहे.
6/6
भारतीय संघाने 2025-27 च्या जागतिक कसोटी हंगामाची सुरुवात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेने केली. भारत-इंग्लंड मालिका 2-2अशी बरोबरीत संपली. भारताने बांगलादेश आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकल्या, परंतु जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका गमावल्या. याचाच फटका भारताला बसल्याचे दिसून येत आहे.
Published at : 22 Dec 2025 08:44 AM (IST)