वर्ल्डकप जिंकणाऱ्या अंध क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट; मराठमोळी उपकर्णधार गंगा भावुक
भारतीय महिला संघाने (अंध क्रिकेट) आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधान मोदींनी सर्व खेळाडूंशी आपुलकीचा संवाद साधला.
Continues below advertisement
Narendra modi meeting blind cricket team ganga
Continues below advertisement
1/8
भारतीय महिला संघाने (अंध क्रिकेट) आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधान मोदींनी सर्व खेळाडूंशी आपुलकीचा संवाद साधला.
2/8
मराठमोळी फलंदाज आणि अंध महिला क्रिकेटच्या टीम इंडियाची उपकर्णधार गंगा कदम ही देखील यावेळी उपस्थित होती. पंतप्रधानांच्या भेटीनंतर तिने आपल्यास आनंद झाल्याचे म्हटले. मात्र, वडिलांच्या आठवणीने भावुक झाली.
3/8
मला आज आनंद झाला, शाळेत असताना मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, मुलांसोबत मी क्रिकेट खेळायची, नंतर सोलापूरला अंध शाळेत गेले, त्यानंतर मुंबईला कीर्ती कॉलेजमध्ये आले.
4/8
नुकतेच माझे वडील वारले, आज त्यांना खूप आनंद झाला असता, त्यांनी नेहमी सपोर्ट केला,मदत केली असे सांगताना वडिलांच्या आठवणीने गंगा भावुक झाली होती
5/8
मोदींसमवेतच्या भेटीनंतरचा हा क्षण घरी गरिबी होती, आज ते जिथे कुठे असतील तिथून बघत असतील, असेही गंगाने यावेळी म्हटले.
Continues below advertisement
6/8
नार्मल क्रिकेट इतकेच मेहनत अंध क्रिकेटमध्ये आहे, अंध क्रिकेटमध्ये तर जास्त मेहनत करावी लागते. लोकांनी सर्वांना महत्व दिलं पाहिजे, मला माहिती होतं की आम्ही जिंकलो तर भविष्यातील पिढ्यांना फायदा होईल म्हणून जिंकायचं होतं, असेही गंगाने यावेळी म्हटले.
7/8
महिला क्रिकेट संघातील माझी आवडती खेळाडू जेमिया आहे. कारण ती मुंबईची आहे, रोहित शर्मा पुरुष संघात मला आवडतो, यापूर्वीचा धोनी आवडता खेळाडू आहे, असेही तिने म्हटले.
8/8
मला ७ नंबर जर्सीला हवा होता, तो मिळाला नाही तर मग ००७ घेतला, इंग्लंडला गेलेले तेव्हा कळलं की जेम्स बाँडाचा हाच नंबर आहे, असेही गंगाने सांगितले
Published at : 29 Nov 2025 08:56 PM (IST)