Ruturaj Gaikwad News : चेन्नईचा 'ऋतू' बदलला! पण पहिल्या विजयानंतर कर्णधार गायकवाडवर BCCIची मोठी कारवाई; रात्री 11 वाजता नेमकं काय घडलं?
Captain Ruturaj Gaikwad Penalised by BCCI : चेन्नई सुपर किंग्सने दमदार खेळ करत दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएल 2026 मधील आपला पहिला विजय नोंदवला.

Why Ruturaj Gaikwad Penalised by BCCI
1/8
चेन्नई सुपर किंग्सने दमदार खेळ करत दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएल 2026 मधील आपला पहिला विजय नोंदवला.
2/8
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघासाठी हा विजय खूप महत्त्वाचा ठरला.
3/8
या सामन्यात संजू सॅमसन आणि जेमी ओव्हरटन यांनी अप्रतिम कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
4/8
मात्र, संघ विजयाचा आनंद साजरा करत असतानाच कर्णधार ऋतुराज गायकवाडवर बीसीसीआयकडून दंड ठोठावण्यात आला आहे.
5/8
शनिवारी, रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या सामन्यात चेन्नईच्या संघाला निर्धारित वेळेत आपली 20 षटके पूर्ण करता आली नाहीत.
6/8
स्लो ओव्हर रेट (Slow Over Rate) च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयने कर्णधार ऋतुराज गायकवाडवर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
7/8
या हंगामातील ही त्यांची पहिली चूक असल्याने हा दंड पहिल्या स्तरावर ठेवण्यात आला आहे.
8/8
आयपीएल 2026 मध्ये स्लो ओव्हर रेटमुळे दंड भोगणारे गायकवाड हे तिसरे कर्णधार ठरले आहेत. याआधी श्रेयस अय्यर (पंजाब किंग्स) आणि शुभमन गिल (गुजरात) यांनाही दंड ठोठावण्यात आला होता.
Published at : 12 Apr 2026 01:38 PM (IST)