Harmanpreet Kaur News : हरमनच्या राजीनाम्यानंतर टीम इंडियात खळबळ; एक-दोन नाही तर 5 मोठे खेळाडू कर्णधारपदाच्या रेसमध्ये, कोण मारणार बाजी?
Harmanpreet Kaur steps down captaincy : हरमनप्रीत कौरने मंगळवारी भारतीय संघाच्या तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
Continues below advertisement

who replace harmanpreet kaur as team india captain
Continues below advertisement
1/11
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्वात मोठा बदल झाला आहे.
2/11
हरमनप्रीत कौरने मंगळवारी भारतीय संघाच्या तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
3/11
सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत हरमनप्रीतने यापुढे संघाचे नेतृत्व न करण्याची घोषणा केली.
4/11
मात्र, तिच्या या निर्णयानंतर आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे तो म्हणजे, हरमनप्रीत कौरची जागा कोण घेणार?
5/11
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि संघ व्यवस्थापन तिन्ही फॉरमॅटसाठी एकाच कर्णधाराची निवड करणार की कसोटी, एकदिवसीय आणि टी-20साठी वेगवेगळे कर्णधार नियुक्त केले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
6/11
दरम्यान, हरमनप्रीतनंतर नेतृत्वासाठी अनेक अनुभवी खेळाडूंची नावे चर्चेत आहेत.
7/11
हरमनप्रीत कौरनंतर कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात चर्चेत असलेले नाव म्हणजे स्मृती मानधना आहे. ती भारतीय संघाची उपकर्णधार असून हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत तिने यापूर्वी संघाचे नेतृत्वही केले आहे.
8/11
मानधनानंतर जेमिमा रॉड्रिग्स हिचे नावही नेतृत्वाच्या चर्चेत आहे. जेमिमा गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघाचा भाग आहे आणि संघातील नेतृत्व गटातही तिचा समावेश आहे.
9/11
भारतीय संघाची यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोष हिचे नावही संभाव्य कर्णधार म्हणून चर्चेत आहे. यष्टीमागून सामन्याचे वाचन करण्याची तिची क्षमता आणि आक्रमक फलंदाजी यामुळे ती संघातील महत्त्वाची खेळाडू बनली आहे.
10/11
अनुभवाला प्राधान्य दिले गेले तर दीप्ती शर्मा हिचे नावही महत्त्वाचे ठरू शकते. दीप्ती गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघातील प्रमुख खेळाडू आहे. तिने भारतीय महिला क्रिकेटमधील अनेक महत्त्वाचे टप्पे जवळून पाहिले आहेत.
11/11
जर भारतीय संघाने फॉरमॅटनुसार वेगवेगळे कर्णधार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला, तर शेफाली वर्मा हिचे नाव टी-20साठी चर्चेत येऊ शकते. शेफाली गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शेफालीकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्याचा अनुभवही आहे.
Published at : 06 Oct 2026 02:57 PM (IST)