एक्स्प्लोर
Who Is Abhimanyu Easwaran : कोण आहे अभिमन्यू ईश्वरन? मेन टीममध्ये संधी नाही, पण BCCIने सोपवली 'अ' संघाची धुरा, पाहा आकडेवारी अन् A टू Z माहिती
आता सध्या क्रिकेट विश्वात अभिमन्यू ईश्वरन खूप चर्चेत आहे. कारण बीसीसीआयने त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघाचा कर्णधार बनवले आहे.
Who Is Abhimanyu Easwaran
1/10

आता सध्या क्रिकेट विश्वात अभिमन्यू ईश्वरन खूप चर्चेत आहे. कारण बीसीसीआयने त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघाचा कर्णधार बनवले आहे.
2/10

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याची कामगिरी चांगली नव्हती. येथे त्याने चार डावांमध्ये फक्त 12, 7, 0 आणि 17 धावा केल्या.
3/10

तरीही, त्याच्यावर विश्वास दाखवत निवडकर्त्यांनी त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआय इंडिया अ संघाचा कर्णधार बनवले आहे. अशा परिस्थितीत, अभिमन्यू ईश्वरन कोण आहे ते जाणून घेऊया?
4/10

image अभिमन्यू ईश्वरन बंगालकडून खेळतो. तो उजव्या हाताचा सलामीवीर फलंदाज आहे.
5/10

ईश्वरनचा जन्म 6 सप्टेंबर 1995 रोजी डेहराडून येथे झाला. त्याचे वडील तमिळ आणि आई पंजाबी आहे. अभिमन्यूने कोलकातामध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले.
6/10

ईश्वरनच्या वडिलांनी 2008 मध्ये त्याला क्रिकेट अकादमीमध्ये पाठवले. त्याने 2017 मध्ये बंगालसाठी टी-20 मध्ये पदार्पण केले. तो इंडिया अ, इंडिया ब आणि बंगाल रणजी संघाचा कर्णधार राहिला आहे.
7/10

imagत्याने 2018-19 च्या रणजी ट्रॉफीमध्ये 861 धावा केल्या. 2021 मध्ये, त्याची भारताच्या कसोटी संघात स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड झाली. 7
8/10

29 वर्षीय अभिमन्यू अद्याप भारतीय वरिष्ठ संघाकडून खेळलेला नाही. यावेळी त्याला मोठी संधी मिळाली आहे. या दौऱ्यावर ध्रुव जुरेलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
9/10

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी दरम्यान भारतीय संघाचा भाग असलेल्या अभिमन्यू ईश्वरनला पदार्पणाची संधी मिळाली नाही.
10/10

ईश्वरनने आतापर्यंत त्याच्या 101 सामन्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 7,674 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 27 शतके आणि 29 अर्धशतकांचा समावेश आहे.
Published at : 17 May 2025 07:11 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बॉलीवूड
पुणे
व्यापार-उद्योग


















