Virat Kohli News : मैदानात उतरायच्या आधी विराटची देवाकडे धाव, न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या निर्णायक लढतीआधी कोहली महाकालाच्या चरणी
रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना इंदूर येथे खेळवला जाणार आहे.

Virat Kohli visit Mahakal Temple in Ujjain
1/8
रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना इंदूर येथे खेळवला जाणार आहे.
2/8
हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, जो संघ हा सामना जिंकेल तोच मालिका आपल्या नावावर करेल.
3/8
या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली यांनी महाकालाच्या चरणी हजेरी लावली.
4/8
विराट कोहली यांच्यासोबत भारतीय संघाचा फिरकीचा जादूगार कुलदीप यादवही उपस्थित होता.
5/8
दोघांनीही महाकाल मंदिरात झालेल्या अलौकिक भस्म आरतीत सहभाग घेतला.
6/8
महत्त्वाच्या सामन्याआधी देवाच्या शरण जाण्याची विराटची ही पहिलीच वेळ नाही.
7/8
गेल्या काही वर्षांपासून पूजा-पाठ आणि अध्यात्माबद्दलची त्यांची श्रद्धा सर्वश्रुत आहे.
8/8
मैदानावर आक्रमक खेळासाठी ओळखले जाणारे विराट कोहली आता अधिक शांत, संयमी आणि ‘कूल’ अंदाजात खेळताना दिसत आहेत.
Published at : 17 Jan 2026 10:29 AM (IST)