Team India ODI Schedule 2026 : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2026 मध्ये रोहित शर्मा-विराट कोहली फक्त इतके ODI सामने खेळणार?, जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी 2025 मध्ये पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताला 2-1 असा शानदार विजय मिळवून देण्यात या दोघांचा मोलाचा वाटा होता.
Continues below advertisement
Team India ODI Schedule 2026
Continues below advertisement
1/16
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी 2025 मध्ये पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. कसोटी मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताला 2-1 असा शानदार विजय मिळवून देण्यात या दोघांचा मोलाचा वाटा होता.
2/16
2027 वर्ल्डकपमधील त्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाही, भारताच्या वनडे यशासाठी कोहली-रोहित अजूनही अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे त्यांनी पुन्हा दाखवून दिले.
3/16
2025 नंतरही हे दोन्ही माजी कर्णधार 2026 मध्ये मैदानावर झळकणार असून, आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे.
4/16
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विराट कोहलीने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावत तब्बल 302 धावा केल्या.
5/16
तर रोहित शर्माने दोन अर्धशतकांच्या जोरावर 146 धावांचे योगदान दिले. हा सामना 2025 मधील भारतासाठी त्यांचा शेवटचा सामना ठरला.
Continues below advertisement
6/16
आता 2026 मध्येही ‘रोको’ म्हणजेच रोहित-कोहली आपल्या फलंदाजीने क्रिकेटविश्वात खळबळ उडवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
7/16
चाहत्यांसाठी खास बाब म्हणजे, या वर्षी हे दोन्ही दिग्गज एकूण 18 वनडे सामने खेळताना दिसणार आहेत.
8/16
यासोबतच आयपीएल 2026 मध्येही ते आपापल्या संघांसाठी मैदानात उतरणार आहेत.
9/16
जानेवारी महिन्यात भारतात न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार असून, यात कोहली-रोहित चाहत्यांना आपला जलवा दाखवताना दिसतील.
10/16
आयपीएल 2026 चे आयोजन 26 मार्च ते 31 मे दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून, तर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल.
11/16
जून महिन्यात अफगाणिस्तान भारत दौऱ्यावर येणार असून, दोन्ही संघांमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाईल.
12/16
भारत इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून, त्यात तीन वनडे सामने खेळवले जातील.
13/16
वेस्ट इंडीज संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून, स्थळ आणि तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.
14/16
भारत न्यूझीलंडमध्ये सर्व फॉरमॅटचे सामने खेळणार असून, त्यात तीन वनडे सामन्यांचाही समावेश आहे. या मालिकेचे स्थळ अद्याप जाहीर व्हायचे आहे.
15/16
2026 मधील भारताची शेवटची मालिका घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.
16/16
या वनडे मालिकेत कोहली आणि रोहित वर्षाअखेरीस शेवटच्या वेळी मैदानावर झळकताना दिसतील.
Published at : 01 Jan 2026 12:57 PM (IST)
= 16">