Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026: पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026:

Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026
1/11
कर्णधार शुभमन गिलच्या शानदार आणि स्फोटक शतकाच्या जोरावर, गुजरात टायटन्सने IPL 2026 च्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. शुक्रवारी खेळल्या गेलेल्या 'क्वालिफायर २' सामन्यात, गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून दारुण पराभव केला. आता, ३१ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यात, गुजरात टायटन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. दोन्ही संघ आपले दुसरे IPL विजेतेपद पटकावण्याच्या एकमेव उद्देशाने मैदानात उतरतील.
2/11
राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी आपल्या भावना आवरू शकला नाही.
3/11
सामना संपल्यानंतर, वैभव सूर्यवंशी राजस्थानच्या डगआउटमध्ये अगदी शांतपणे बसून राहिला आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू स्पष्टपणे दिसत होते.
4/11
आपल्या संघाला अंतिम फेरीत नेण्यात अपयश आल्याची वेदना वैभव सूर्यवंशी 15 वर्षीय खेळाडूच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटली होती आणि तो अत्यंत भावूक झालेला दिसत होता.
5/11
वैभव सूर्यवंशी खूप निराश झाला होता. यानंतर राजस्थानच्या खेळाडूंनी त्याची भेट घेऊन त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
6/11
सामना संपल्यानंतर वैभव सूर्यवंशी रवींद्र जडेजासोबत बोलताना दिसला.
7/11
वैभव सूर्यवंशीने यावेळी रवींद्र जडेजाला आपल्या मनातल्या भावना सांगितल्या.
8/11
रवींद्र जडेजाही वैभव सूर्यवंशीचं ऐकत बसला.
9/11
वैभव सूर्यवंशीचं ऐकल्यानंतर रवींद्र जडेजाही त्याला समजावत होता.
10/11
वैभव सूर्यवंशीचे फोटो आणि व्हिडीओ पाहून भारतातील सगळेचे क्रिकेटप्रेमी भावूक झाले.
11/11
वैभव सूर्यवंशीसाठी राजस्थान रॉयल्सने ट्रॉफी जिंकायला हवी होती, अशा भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या.
Published at : 30 May 2026 07:24 AM (IST)