Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
Ind vs NZ: टी20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांनी धुव्वादार फलंदाजी केली. संपूर्ण मालिकेत फेल ठरलेल्या अभिषेक शर्माने आज धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत सर्वांचे तोंड बंद केले.
Continues below advertisement

Sanju samsan hit 89 against New zealand T20 Wordlcup
Continues below advertisement
1/8
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांनी धुव्वादार फलंदाजी केली. संपूर्ण मालिकेत फेल ठरलेल्या अभिषेक शर्माने आज धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत सर्वांचे तोंड बंद केले.
2/8
अभिषेक आणि संजू सॅमसनच्या धुव्वादार फलंदाजीने भारताला अवघ्या 7 व्या षटकात शतक झळकावता आले. त्यात, अभिषेक शर्माने 18 चेंडू 51 धावांची खेळी केली.
3/8
अभिषेकच्या तुफानी खेळीला संजू सॅमसनेही तडाखा दिला. संजूच्या वादळी खेळीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली होती. आजच्या सामन्यात तरी संजूचं शतक होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, संजू 89 धावांवर बाद झाला.
4/8
संजू सॅमसनने 14 व्या षटकात सलग तीन षटकार ठोकले, स्कोअर बोर्डवर 14 व्या षटकांनंतर भारताची धावसंख्या अवघ्या एक विकेटवर 191 धावा एवढी होती.
5/8
संजू शतकाच्या उंबरठ्यावर होता, 43 चेंडूत 88 धावा झळकावलेल्या संजूने 44 व्या चेंडूवर उत्तुंग शॉट लगावला. मात्र, मिड ऑफवरील मॅककोनिकलने संजूचा अफलातून झेल घेतला.
Continues below advertisement
6/8
संजूने 44 चेंडूत 88 धावांवर खेळत डोळ्याचं पारणं फेडणारी खेळी केली. त्याने, आपल्या 44 चेंडूंच्या खेळीत 5 चौकार आणि 8 षटकार ठोकले. संजूचे शतक हुकले पण त्याने धुव्वादार ठोकले.
7/8
संजूच्या खेळीने आज पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले, गेल्या 2 सामन्यात शतक हुकल्यानंतरही आज त्याने शेवटच्या क्षणापर्यंत सुंदर फटकेबाजी करत टीम इंडियाचा स्ट्राईक रेट उंचीवरच ठेवला.
8/8
दरम्यान, ईशान किशनने 25 चेंडूत 54 धावांची तडाकेबाज खेळी करत चाहत्यांची मने जिंकली. त्याने 4 चौकार आणि 4 षटकार ठोकले. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादव शून्य धावावर बाद झाला.
Published at : 08 Mar 2026 08:47 PM (IST)