टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
एकीकडे टीम इंडिया अहमदाबादमध्ये पोहोचली असून उद्या म्हणजेच 8 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याच्या तयारीत आहे.

Rohit sharma Practice on shivaji park mumbai
1/7
एकीकडे टीम इंडिया अहमदाबादमध्ये पोहोचली असून उद्या म्हणजेच 8 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याच्या तयारीत आहे.
2/7
टीम इंडियासह दिग्गज खेळाडू, सेलिब्रिटी आणि चाहतेही गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचले आहेत.
3/7
टी20 विश्वचषकातील अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होत असून भारतासह अवघ्या जगातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष तिकडे लागले आहे. मात्र,रोहित शर्मा आज मुंबईत दिसून आला.
4/7
रोहित शर्माने आज मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर क्रिकेटचा सराव केला, त्याने येथे फटकेबाजी केली.
5/7
पायात पॅड, हाती ग्लोज घालून आपल्या बॅटीने मैदानावर तुफान फटकेबाजी केली. यावेळी, लाडक्या रोहितला पाहण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती.
6/7
रोहितची शिवाजी पार्कच्या मैदानातील फलंदाजी पाहण्यासाठी नेटबाहेर क्रिकेट चाहत्यांनी गर्दी केली.
7/7
रोहित शर्मासोबत फोटो काढण्याचा मोह देखील यावेळी चाहत्यांना आवरता आला नाही, तर ज्यांना फोटो काढता आला नाही, त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये रोहितच्या फलंदाजीचे क्षण कैद केले.
Published at : 07 Mar 2026 09:51 PM (IST)