एक्स्प्लोर
Smriti Mandhana ICC ODI Rankings : आयसीसी रँकिंगच्या शिखरावर स्मृतीचा झेंडा; 6 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा बनली नंबर 1
Smriti Mandhana News : भारताची उपकर्णधार स्मृती मानधना हिला आयसीसी रँकिंगमध्ये तिच्या दमदार कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे.
Smriti Mandhana ICC ODI Rankings News
1/9

भारताची उपकर्णधार स्मृती मानधना हिला आयसीसी रँकिंगमध्ये तिच्या दमदार कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे.
2/9

स्मृती मानधना पुन्हा एकदा आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये नंबर वन फलंदाज बनली आहे.
3/9

2019 नंतर पहिल्यांदाच भारतीय फलंदाज अव्वल स्थानावर पोहोचली आहे.
4/9

दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट हिने ताज्या अपडेटमध्ये 19 रेटिंग गुण गमावले आहेत.
5/9

याचा फायदा भारताची उपकर्णधार स्मृती मानधना हिला झाला आहे.
6/9

मंगळवारी जाहीर झालेल्या रँकिंगमध्ये स्मृती मानधना हिचे एकूण 727 रेटिंग गुण आहेत.
7/9

तिच्यानंतर इंग्लंडची कर्णधार नताली सायव्हर-ब्रंट 719 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
8/9

वोल्वार्ड्ट आता 719 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
9/9

मानधना नंतर या यादीतील पुढील दोन भारतीय फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर आहेत. जेमिमा 14 व्या आणि हरमनप्रीत कौर 15 व्या स्थानावर आहे.
Published at : 17 Jun 2025 05:11 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रिकेट
ऑटो
महाराष्ट्र
















