एक्स्प्लोर
Shubman Gill News : 5 तास गौतम गंभीरसोबत बंद खोलीत चर्चा, मग नवीन कसोटी कर्णधाराच्या नावावर शिक्कामोर्तब! कोण होणार कर्णधार? नाव आले समोर
India Squad For England Tour : आता जवळपास एक महिन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडचा दौरा करायचा आहे.
Shubman Gill Team India new Test captain
1/11

आता जवळपास एक महिन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडचा दौरा करायचा आहे.
2/11

दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामने खेळले जाणार आहेत.
3/11

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर इंग्लंड दौऱ्यावर कोणते खेळाडू जाणार याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
4/11

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाची घोषणा 23 मे रोजी केली जाऊ शकते, परंतु त्याआधी भारताच्या नवीन कसोटी कर्णधाराबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
5/11

image 4
6/11

वृत्तसंस्था पीटीआयनुसार, शुभमन गिल भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार होऊ शकतो.
7/11

अलिकडेच कर्णधारपदाच्या शर्यतीत ऋषभ पंत, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांची नावेही घेण्यात आली आहेत.
8/11

पीटीआयच्या वृत्तानुसार, शुभमन गिलने अलीकडेच दिल्लीत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची भेट घेतली.
9/11

असे म्हटले जात आहे की, त्यांची बैठक 4-5 तास चालली आणि गौतम गंभीरने जवळजवळ शिक्कामोर्तब केला की तो गिलला कर्णधार करणार आहे.
10/11

अलिकडेच, जसप्रीत बुमराहला कसोटी कर्णधार करण्याबाबत अटकळांना वेग आला होता, जो सध्या कसोटी संघाचा उपकर्णधार देखील आहे.
11/11

गिलला कर्णधार बनवण्यात आल्याने बोर्डातील काही वरिष्ठ अधिकारी फारसे खूश नसल्याचेही अहवालात उघड झाले आहे, तरीही गिलला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
Published at : 17 May 2025 05:17 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















