Ruturaj Gaikwad News : ODI टीममधून डच्चू, अवघ्या 5 दिवसांत ऋतुराजचा ‘बॅटने सूड’! रचला नवा इतिहास, कोहली-मायकेल बेवनलाही टाकले मागे, निवडकर्त्यांना दिला थेट इशारा
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याच्या अवघ्या पाच दिवसांतच ऋतुराज गायकवाडने आपल्या फटक्यांनी जोरदार उत्तर दिलं.
Ruturaj Gaikwad Vijay Hazare Trophy News
1/8
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याच्या अवघ्या पाच दिवसांतच ऋतुराज गायकवाडने आपल्या फटक्यांनी जोरदार उत्तर दिलं.
2/8
विजय हजारे ट्रॉफीत महाराष्ट्राचं नेतृत्व करताना त्याने गोव्याविरुद्ध 131 चेंडूमध्ये अफलातून 134 धावांची खेळी खेळली.
3/8
त्याने आपले 20वे लिस्ट-ए शतक झळकावत विजय हजारे ट्रॉफीतील सर्वाधिक शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
4/8
या विक्रमात त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज मायकेल बेवन आणि भारताचा स्टार विराट कोहली यांनाही मागे टाकले आहे.
5/8
आधीच नॉकआऊट शर्यतीतून बाहेर पडलेल्या महाराष्ट्राची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. अशा कठीण क्षणी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋतुराज गायकवाडने एकहाती लढा दिला आणि संघाचा डाव सावरला.
6/8
केवळ 59 डावांत विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक शतकांचा विक्रम गायकवाडने गाठला.
7/8
लिस्ट-ए क्रिकेटमध्ये गायकवाडने फक्त 95 डावांत 20 शतके पूर्ण करत सर्वात कमी डावांत हा टप्पा गाठणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला.
8/8
या खेळीतच त्याने विक्रमी वेगाने 5000 लिस्ट-ए धावाही पूर्ण केल्या.
Published at : 09 Jan 2026 11:59 AM (IST)
= 8">