Rohit Sharma: रोहित शर्माचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, वाढलेलं पोट एकदम सपाट पाहून गौतम गंभीरही थक्क होईल!
Rohit Sharma :ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा मैदानात उतरणार का, यावर चर्चा सुरु होती.मात्र, रोहित शर्माने ट्रान्सफॉर्मेशन करून टीकाकारांना ठोस प्रत्युत्तर दिलं.
Continues below advertisement
Rohit Sharma
Continues below advertisement
1/9
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी एकदिवस सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने नुकतीच भारतीय संघाची घोषणा केली होती. यावेळी क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला होता.
2/9
भारतीय संघाला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या रोहित शर्मा याची कर्णधारपदावरुन अचानक उचलबांगडी करण्यात आली होती. प्रशिक्षक गौतम गंभीर याने रोहितच्या जागी शुभमन गिलला कर्णधारपदाचा मुकूट सोपवला होता.
3/9
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा हा कदाचित शेवटचा दौरा असू शकतो, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेच्यादृष्टीने तयार करण्यात येणाऱ्या भारतीय संघात रोहित शर्मा फिट बसणार नाही, असे सांगितले जाते.
4/9
रोहित शर्मा याचे वाढलेले वजन, सुटलेले पोट याकडे बोट दाखवले जाते. मात्र, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी रोहित शर्माने वजन कमालीचे कमी केले असून स्वत:मध्ये खूप मोठा बदल घडवून आणला आहे.
5/9
मुंबईत मंगळवारी सीएट क्रिकेट पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी ब्लेझर घालून आलेल्या रोहित शर्माला पाहून अनेकांना स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.
Continues below advertisement
6/9
रोहित शर्मा याचे पोट पूर्णपणे कमी झाले असून तो एकदम स्लिम ट्रिम दिसत होता. एरवी रोहित शर्मा म्हटलं की, थोडसं सुटलेलं पोट अशी प्रतिमा डोळ्यांसमोर यायची. रोहित शर्मा याचे पोट पूर्णपणे कमी झाले असून तो एकदम स्लिम ट्रिम दिसत होता.
7/9
एरवी रोहित शर्मा म्हटलं की, थोडसं सुटलेलं पोट अशी प्रतिमा डोळ्यांसमोर यायची. मात्र, रोहित शर्मा याने आता स्वत:मध्ये कमालीचा बदल घडवून गौतमी गंभीर आणि इतर टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
8/9
रोहित शर्मा हा 38 वर्षांचा असून आता त्याच्या कारकीर्दीचा उतरणीचा काळ सुरु झाला आहे. मात्र, भारतीय संघाला अनेक जेतेपदं मिळवून देणाऱ्या रोहित शर्मा याला इतक्या तडकाफडकी कर्णधारपदावरुन दूर करणे भारतीय क्रिकेटप्रेमींना रुचलेले नाही.
9/9
त्यामुळे रोहित शर्माविषयी अनेकजण सहानुभूती व्यक्त करत आहेत. अशातच रोहित शर्मा याने स्वत:मध्ये कमालीचे ट्रान्सर्फोमेशन करुन आपण अजूनही आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळण्यासाठी फिट आहोत, असा संदेश बीसीसीआयला दिला आहे.
Published at : 08 Oct 2025 12:13 PM (IST)