Rohit Sharma Meet Devendra Fadnavis: रोहित शर्मा थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी; देवेंद्र फडणवीस म्हणाले, कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर...

Rohit Sharma Meet Devendra Fadnavis: रोहित शर्माने काल वर्षा या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Rohit Sharma Meet Devendra Fadnavis

1/6
Rohit Sharma Meet Devendra Fadnavis: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma Retirement) याने काल (7 मे) कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकत रोहित शर्माने कसोटीमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. तसेच यापुढे टीम इंडियासाठी वनडे क्रिकेट खेळत राहणार असल्याचं देखील रोहित शर्माने स्पष्ट केले.
2/6
रोहित शर्मा यंदाची उर्वरित आयपीएल स्पर्धा देखील खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तानच्या तणावामुळे आयपीएलची स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित सामने 17 मे पासून खेळवण्यात येणार आहे. मात्र याचदरम्यान रोहित शर्माने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
3/6
रोहित शर्माने काल वर्षा या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
4/6
रोहित शर्माने देवेंद्र फडणवीसांची भेट का घेतली हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.
5/6
देवेंद्र फडणवीस यांनी रोहित शर्मासोबतच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
6/6
वर्षा या माझ्या निवासस्थानी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचे स्वागत करणे, त्याला भेटणे आणि त्याच्याशी संवाद साधल्यानंतर खूप छान वाटले. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याबद्दल आणि त्याच्या प्रवासाच्या पुढील टप्प्यात यश मिळावे यासाठी मी रोहित शर्माला शुभेच्छा दिल्या, असं देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले.
Sponsored Links by Taboola