Rohit Sharma : पराभवाचा 'चौकार'! लाजिरवाण्या यादीत रोहित शर्माचं नाव
रविवारी (8 डिसेंबर) ॲडलेडमध्ये संघाचा 10 गडी राखून पराभव झाल्यानंतर रोहितने भारतीय कर्णधार म्हणून सलग चौथा कसोटी सामना गमावला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीम इंडियाने पर्थमधील पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्या सामन्यात रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने कर्णधारपद भूषवले होते. आता ऑस्ट्रेलियाने दुसरी कसोटी जिंकून 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वी रोहितने न्यूझीलंडविरुद्ध त्याच्या नेतृत्वाखाली सलग तीन सामने गमावले होते. आता ॲडलेडमधील पराभवाने हा क्रम पुढे नेला आहे.
कसोटीत सलग 4 किंवा त्यापेक्षा जास्त सामने गमावलेल्या भारतीय कर्णधारांच्या यादीत तो सामील झाला. असे अनेक भारतीय कर्णधार आहेत ज्यांनी सलग चार कसोटी सामने गमावले आहेत.
रोहितने या बाबतीत माजी कर्णधार विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि दत्ता गायकवाड यांची बरोबरी केली आहे. या तिघांच्या नेतृत्वाखालीही टीम इंडियाने सलग 4 सामने गमावले होते. यापैकी धोनीच्या कार्यकाळात असे दोनदा घडले.
सलग 4 किंवा त्याहून अधिक कसोटी सामने गमावलेले भारतीय कर्णधार मंसूर अली खान पतौडी (1967-68) आहे, त्याने 6 सलग सामने हारले आहेत. त्यानंतर सचिन तेंडुलकर (1999-00) पाच सामने हारले.
दत्ता गायकवाड (1959), महेंद्रसिंग धोनी (2011), महेंद्रसिंग धोनी (2014), विराट कोहली (2020-21) यांनी 4 चार सामने हारले आहेत. आता या यादीत रोहित शर्मा पण आला आहे.