T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कपच्या मोहिमेवर टीम इंडियाची पहिली तुकडी रवाना, रोहित शर्मासह अमेरिकेला कोण कोण गेलं?
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची पहिली तुकडी रवाना झाली आहे. कॅप्टन रोहित शर्मासह प्रमुख खेळाडू अमेरिकेला रवाना झाले आहेत. दुसरी तुकडी आयपीएल फायनल संपल्यानंतर रवाना होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीम इंडियाचे खेळाडू छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून अमेरिकेला रवाना झाले. यावेळी रोहित शर्मासोबत जसप्रीत बुमराह देखील उपस्थित होता.
टी-20 क्रिकेटमधील आयसीसी रँकिंगमधील पहिल्या स्थानावरील टीम इंडियाचा खेळाडू सूर्यकुमार यादव देखील अमेरिकेला रवाना झालाय.
मोहम्मद सिराज देखील अमेरिकेला रवाना झालाय. भारताची अमेरिकेत पोहोचल्यानंतर सराव सामन्यांमधील लढत बांगलादेश विरुद्ध 1 जूनला होणार आहे.
शुभमन गिलची निवड राखीव खेळाडू म्हणून झाली आहे. शुभमन गिल देखील अमेरिकेला रवाना झालाय.
आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जच्या शिवम दुबेला देखील टीम इंडियात संधी मिळाली आहे. शिवम दुबे देखील अमेरिकेला रवाना झाला आहे.