Rohit Sharma IND vs AFG : चेन्नईच्या मैदानात 'रो-सुपरहिट' शो! रोहितने मैदानात असं काही केलं की 13 वर्षांचा इतिहास-भूगोल बदलला
Rohit Sharma IND vs AFG 3rd ODI : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसऱ्या वन-डे सामन्यात रोहित शर्माने स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना एक असा पराक्रम केला, ज्याची नोंद क्रिकेटच्या इतिहासात झाली आहे.
Continues below advertisement

Rohit Sharma IND vs AFG 3rd ODI News
Continues below advertisement
1/7
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसऱ्या वन-डे सामन्यात रोहित शर्माने स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना एक असा पराक्रम केला, ज्याची नोंद क्रिकेटच्या इतिहासात झाली आहे.
2/7
रोहितने घेतलेले हे 3 झेल का खास आहेत आणि त्यामुळे अनोखा विक्रम बनला आहे.
3/7
सामन्याच्या सुरुवातीलाच भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर अफगाणिस्तानचे फलंदाज चाचपडत होते. यादरम्यान प्रसिद्ध कृष्णाने घेतलेल्या सुरुवातीच्या पहिल्या तिन्ही विकेट्समध्ये रोहित शर्माने स्लिपमध्ये अप्रतिम झेल टिपले.
4/7
एकाच डावात सुरुवातीच्या तिन्ही फलंदाजांना एकाच क्षेत्ररक्षकाने कॅच आऊट करण्याची ही घटना अत्यंत दुर्मिळ आणि खास आहे.
5/7
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात तब्बल 13 वर्षांनंतर असा पराक्रम पाहायला मिळाला आहे. रोहित शर्माच्या आधी, 2013 मध्ये सुरेश रैनाने श्रीलंकेविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना सुरुवातीचे सलग 3 झेल घेण्याचा कारनामा केला होता.
Continues below advertisement
6/7
वन-डे क्रिकेटमध्ये भारतासाठी कोणत्याही संघाविरुद्ध डावातील पहिले 3 गडी केवळ झेलबाद करून तंबूत परतवणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत आता रोहित शर्माचे नाव समाविष्ट झाले आहे.
7/7
रोहित शर्माच्या या चपळ क्षेत्ररक्षणामुळे अफगाणिस्तानची अवस्था सुरुवातीलाच 3 बाद 28 धावा अशी दयनीय झाली होती, ज्यामुळे हा सामना आणि रोहितचे हे 3 झेल भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहतील.
Published at : 20 Jun 2026 05:22 PM (IST)