RCB vs DC, WPL Final: EE SALA CUP NAMDU...आरसीबीने दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद; स्मृती मानधनाचं जोरदार सेलिब्रेशन, PHOTO
RCB vs DC, WPL Final: महिला प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात आला.

RCB Smriti Mandhana Celebration Photo
1/10
RCB vs DC, WPL Final: महिला प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात आला.
2/10
या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 6 विकेट्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला.
3/10
पहिल्या डावात फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने अंतिम सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या उभारली.
4/10
कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर दिल्लीने 203 धावांचा डोंगर उभारला.
5/10
दिल्लीने दिलेल्या लक्षाचे यशस्वी पाठलाग करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 6 विकेट्सने बाजी मारली.
6/10
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने महिला प्रीमियर लीगची दुसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे.
7/10
आरसीबीकडून कर्णधार स्मृती मानधना हिनं 87 धावांची खेळी केली आहे.
8/10
जॉर्जिया व्हॉल हिनं 79 धावांची खेळी केली. या दोघींच्या फलंदाजीच्या जोरावर आरसीबीनं विजेतेपद मिळवलं
9/10
जेमिमा रॉड्रिग्जच्या दिल्ली कॅपिटल्सनं सलग चारवेळा अंतिम फेरीत धडक दिली. मात्र, त्यांच्या संघाचं विजेतेपदाचं स्वप्न यंदा देखील पूर्ण होऊ शकलं नाही.
10/10
डब्ल्यूपीएलच्या चार हंगामात दोनवेळा मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं विजेतेपद पटकावलं आहे.
Published at : 06 Feb 2026 07:33 AM (IST)