Pat Cummins : पॅट कमिन्सनं इतिहास रचला, सलग दोन मॅचमध्ये हॅटट्रिक,अफगाणिस्तानविरुद्ध विक्रमी कामगिरी
Pat Cummins Hat Trick, T20 World Cup 2024 : पॅट कमिन्सनं अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये सलग तीन विकेट घेत इतिहास रचला आहे.

पॅट कमिन्स
1/5
पॅट कमिन्सनं अँटिग्वामध्ये झालेल्या बांगलादेश विरुद्ध हॅटट्रिक केली होती. टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलग तीन विकेट घेणारा पॅट कमिन्स दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला होता. पॅट कमिन्सनं अफगाणिस्तान विरुद्ध देखील हॅटट्रिक केली आहे.
2/5
पॅट कमिन्स टी 20 वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक करणारा सातवा खेळाडू आहे. पॅट कमिन्सनं करीम जनत, राशिद खान आणि गुलबदीन नैब या तिघांना बाद करत हॅटट्रिक केली होती.
3/5
पॅट कमिन्सनं 18 व्या ओव्हरमध्ये अखेरच्या बॉलवर अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खान याला बाद केलं. यानंतर 20 व्या ओव्हरच्या पहिल्या दोन बॉलमध्ये विकेट घेत कमिन्सनं इतिहास रचला.
4/5
पॅट कमिन्सनं चार ओव्हरमध्ये 3 विकेट 28 धावा देत काढल्या. यामुळं अफगाणिस्तानची धावसंख्या 150 च्या वर जाऊ शकली नाही.
5/5
पॅट कमिन्सनं सलग दुसऱ्या मॅचमध्ये हॅटट्रिक केली आहे. ऑस्ट्रेलियाकडून 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये ब्रेट लीनं हॅटट्रिक केली होती.
Published at : 23 Jun 2024 08:22 AM (IST)