Rachin Ravindra: चेंडू थेट तोंडावर आदळला, पाण्यासारखं रक्त वाहू लागलं; मैदानात शांतता, सर्व चिंतीत, पाकिस्तानच्या प्रेक्षकांनी काय केलं?, Photo
New Zealand vs Pakistan Rachin Ravindra: पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या सामन्यात एक गंभीर घटना घडली.

Rachin Ravindra
1/8
पाकिस्तान, न्यूझीलंड आणि साऊथ अफ्रिका यांच्यात तिरंगी मालिका खेळवण्यात येत आहे.
2/8
पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा काल सामना रंगला होता. न्यूझीलंडने हा सामना 78 धावांनी जिंकला.
3/8
पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या सामन्यात एक गंभीर घटना घडली. यामध्ये न्यूझीलंडचा फिरकीपटू रचिन रवींद्रला क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाली.
4/8
38 व्या षटकांत क्षेत्ररक्षण करताना एका कॅचचा अंदाज चुकल्याने रचिन रविंद्रच्या तोंडावर बॉल आदळला.
5/8
वेगवान गतीने तोंडवर चेंडू आदळल्याने काही क्षणात पाण्यासारखं रक्त त्याच्या डोक्यातून येऊ लागलं.
6/8
रचिन रवींद्रला या स्थितीत पाहून न्यूझीलंडच्या खेळाडूंसह, पाकिस्तानचे खेळाडू आणि मैदानात उपस्थित असणारे चाहत्यांनाही चिंता वाटू लागली.
7/8
सदर घटनेनंतर रचिन रवींद्रला मैदानाबाहेर घेऊन गेले.
8/8
रचिन रवींद्रला मैदानाबाहेर घेऊन जात असताना पाकिस्तानच्या चाहत्यांनी उभे राहून टाळ्या वाजवून कौतुक केले.
Published at : 09 Feb 2025 09:33 AM (IST)