Jonty Rhodes : जगातील सर्वात बेस्ट फिल्डर कोण? फिल्डिंगमधील बाप माणसाने सांगितलं नाव
Jonty Rhodes : जगातील सर्वात बेस्ट फिल्डर कोण? जॉन्टी ऱ्होड्सने सांगितलं नाव

Photo Credit - abp majha reporter
1/10
Jonty Rhodes : जगभरातील क्रिकेट प्रेमींना सर्वात बेस्ट फिल्डिंग कोण करतं? हा प्रश्न विचारला तर कोणीही जॉन्टी ऱ्होड्स शिवाय दुसरा चेहरा आठवणार नाही. मात्र, जगातील सर्वात बेस्ट फिल्डर कोण? याबाबत खुद्द जॉन्टी ऱ्होड्सने भाष्य केलंय.
2/10
सध्याच्या घडीला असाही एक खेळाडू आहे, ज्याने जॉन्टी ऱ्होड्सला मागे टाकलंय.
3/10
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून न्यूझीलंडचा खेळाडू ग्लेन फिलीप्स आहे.
4/10
खुद्द जॉन्टी ऱ्होड्सने याबाबत सांगितलं आहे.
5/10
सोशल मीडियावरिल एका यूजरने जॉन्टी ऱ्होड्सला टॅग करत एक पोस्ट शेअर केली होती.
6/10
त्या पोस्टमध्ये यूजरने लिहिलं होतं की, सॉरी जॉन्टी ऱ्होड्स सध्याच्या घडीला ग्लेन फिलीप्स बेस्ट फिल्डर आहे.
7/10
त्यानंतर जॉन्टीने स्वत: या पोस्टवर प्रतिक्रिया दिली.
8/10
जॉन्टी म्हणाला, सॉरी म्हणू नका..याबाबत मी देखील सहमत आहे.
9/10
चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान, ग्लेन फिलीप्सने दमदार क्षेत्ररक्षण करत सर्वांची मने जिंकली होती.
10/10
एक- दोन नाही तर ग्लेन फिलीप्सने तीन अविश्वसनीय कॅच पकडले.
Published at : 12 Mar 2025 05:14 PM (IST)