Jasprit Bumrah News : जसप्रीत बुमराहच्या कारकिर्दीतील सर्वात काळा दिवस; 4 षटकांत धू-धू-धुतले, टी-20 वर्ल्ड कपपूर्वी धोक्याची घंटा
Jasprit Bumrah Most Expensive Spell In T20i : बुमराहला कीवी फलंदाजांनी मैदानाच्या चारही बाजूंनी फटकेबाजी करत अक्षरशः धू-धू-धुतले.
Continues below advertisement
Jasprit Bumrah Most Expensive Spell In T20i
Continues below advertisement
1/10
तिरुवनंतपुरम येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाचव्या टी-20 सामन्यात भारताने 46 धावांनी दणदणीत विजय मिळवला असला, तरी संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी हा सामना अक्षरशः दु:स्वप्न ठरला.
2/10
271 धावांच्या भल्या मोठ्या धावसंख्येचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांकडून वर्चस्व अपेक्षित होते.
3/10
मात्र बुमराहला कीवी फलंदाजांनी मैदानाच्या चारही बाजूंनी फटकेबाजी करत अक्षरशः धू-धू-धुतले.
4/10
जसप्रीत बुमराहने आपल्या 4 षटकांत एकही विकेट न घेता तब्बल 58 धावा दिल्या.
5/10
हा त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात महागडा आणि निराशाजनक स्पेल ठरला.
Continues below advertisement
6/10
सामन्यात एका टप्प्यावर बुमराह पूर्णपणे हतबल दिसत होते. त्याच्या तिसऱ्या षटकात डॅरिल मिचेल आणि बेवन जेकब्स यांनी 22 धावा वसूल केल्या.
7/10
6.5 पेक्षा कमी इकॉनॉमी रेट असलेले बुमराह या मालिकेत 9.46 च्या सरासरीने धावा देत आहेत, जे त्याच्या दर्जाला साजेसे नाही.
8/10
बुमराहची घसरलेली फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरत आहे, कारण 7 फेब्रुवारीपासून भारत टी-20 वर्ल्ड कपचे विजेतेपद बचावण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
9/10
2024 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताच्या यशामागे बुमराहचा मोठा वाटा होता.
10/10
मात्र सध्याच्या मालिकेतील 4 सामन्यांत केवळ 4 विकेट मिळणे हे त्यांच्या लयीचा अभाव स्पष्टपणे दर्शवते.
Published at : 01 Feb 2026 07:28 AM (IST)
= 10">