Ishan Kishan : वय फक्त 25, वर्षाला एक कोटींची कमाई; ईशान किशनची एकूण संपत्ती आणि आलिशान गाड्यांचं कलेक्शन पाहा
भारतीय युवा स्टार क्रिकेटपटू ईशान किशन पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी संकटमोचक ठरला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appईशान किशनने आशिया कप 2023 (Asia Cup 2023) मध्ये पाकिस्तानविरुद्ध शानदार खेळी करून भारतीय चाहत्यांची मनं जिंकली. त्याची 82 धावांची अप्रतिम खेळी संघासाठी महत्त्वाची ठरली.
युवा स्टार क्रिकेटपटू ईशान किशनची कमाई किती, त्याची एकूण संपत्ती याबाबत सविस्तर जाणून घ्या.
भारताचा युवा फलंदाज ईशान किशन हा बिहारचा रहिवासी असून तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. भारतीय क्रिकेट संघ कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये ईशान खेळत आहे.
ईशान किशनला बीसीसीआय ग्रेड सी अंतर्गत दरवर्षी 1 कोटी रुपये पगार देते. त्यांची एकूण संपत्ती 8 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 60 कोटी रुपये आहे.
यासोबतच ईशान किशनची आयपीएलमधूनही चांगली कमाई होते. आयपीएलच्या 2016 मध्ये गुजरात लायन्सने त्याला 3.5 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. त्यानंतर 2017 मध्ये ईशानला 3.5 कोटी देण्यात आले. यानंतर 2018 पासून ईशान किशन मुंबई इंडियन्स संघाचा भाग बनला.
मुंबई इंडियन्स 2018 मध्ये त्याला 6.2 कोटींना खरेदी केलं. मुंबई इंडियन्सने ईशानला 2019 मध्ये 6.2 कोटी रुपये आणि त्यानंतर 2020-21 मध्ये 6.2 कोटी रुपयांना खरेदी केलं. यानंतर, 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला 15.5 कोटी रुपयांना विकत घेतलं आणि 2023 मध्ये त्याला पुन्हा 15.5 कोटी रुपयांना संघात कायम ठेवलं.
ईशान किशनही अनेक ब्रँडशी संबंधित आहे. यामध्ये CEAT, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ब्लिट्झपूल, अपोजिट इंडिया, मान्यवर, गो नॉईज, सॅन्सपरिल्स ग्रीनलँड्स (एसजी) आणि इतरही काही ब्रँड्सचा समावेश आहे. यामधूनही त्याला उत्पन्न मिळतं
ईशान किशनने आलिशान गाड्यांचंही कलेक्शन आहे.
त्याच्याकडे मर्सिडीज-बेंझ सी-क्लास, फोर्ड मस्टँग आणि बीएमडब्ल्यू 5 सीरीज कार आहे. फक्त बीएमडब्ल्यू 5 सीरीज कारची किंमत सुमारे 72 लाख रुपये आहे.