IPL 2026 Flop Players : 15 कोटींहून जास्त पैसे घेतले, पण फँचायझीला चूना लावून गेले; IPL 2026 मधील फ्लॉप 5 खेळाडू...
आयपीएल 2026 चा हंगाम अनेक कारणांनी चर्चेत राहिला. वैभव सूर्यवंशीची तुफानी फलंदाजी, पंजाब किंग्सचा ऐतिहासिक रनचेस आणि आरसीबीचे सलग दुसरे विजेतेपद यामुळे हा सीझन चाहत्यांच्या कायम स्मरणात राहणार आहे.
Continues below advertisement

IPL 2026 Flop Players
Continues below advertisement
1/8
आयपीएल 2026 चा हंगाम अनेक कारणांनी चर्चेत राहिला. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची तुफानी फलंदाजी, पंजाब किंग्सचा ऐतिहासिक रनचेस आणि आरसीबीचे सलग दुसरे विजेतेपद यामुळे हा सीझन चाहत्यांच्या कायम स्मरणात राहणार आहे.
2/8
मात्र, काही खेळाडूंवर फ्रँचायझींनी कोट्यवधी रुपये खर्च केले, पण त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. त्यामुळे ते संघासाठी मोठी डोकेदुखी ठरले.
3/8
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत याच्याकडून यंदाही मोठ्या अपेक्षा होत्या. तब्बल 27 कोटी रुपयांत विकत घेतलेल्या पंतने 14 सामन्यांत 138 च्या स्ट्राइक रेटने केवळ 312 धावा केल्या. संपूर्ण हंगामात त्याच्या नावावर फक्त एक अर्धशतक जमा झाले. पंतच्या अपयशाचा फटका एलएसजीला बसला आणि संघ गुणतालिकेत तळाशी राहिला. हंगामानंतर त्याने कर्णधारपदही सोडले.
4/8
कोलकाता नाईट रायडर्सने कॅमेरून ग्रीनला संघात घेण्यासाठी 25.20 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, ग्रीनने अपेक्षाभंग केला. त्याने 14 सामन्यांत 145 च्या स्ट्राइक रेटने फक्त 322 धावा केल्या आणि दोन अर्धशतके झळकावली. दुखापतीतून नुकताच सावरल्याचे कारण देत त्याने सुरुवातीच्या सामन्यांत गोलंदाजी टाळली, तर नंतरही चेंडूने विशेष प्रभाव पाडता आला नाही.
5/8
मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादवला कायम ठेवण्यासाठी 16.35 कोटी रुपये मोजले होते. मात्र, भारतीय टी-20 संघाचा हा स्टार फलंदाज यंदा पूर्णपणे अपयशी ठरला. 13 डावांत त्याने 147 च्या स्ट्राइक रेटने केवळ 270 धावा केल्या. त्याच्या नावावर दोन अर्धशतके असली तरी सातत्याचा पूर्ण अभाव दिसून आला. सूर्यकुमारची खराब फलंदाजी मुंबईच्या निराशाजनक मोहिमेचे एक प्रमुख कारण ठरली.
Continues below advertisement
6/8
लखनऊ सुपर जायंट्सने निकोलस पूरनला 21 कोटी रुपयांत रिटेन केले होते. मात्र, तोही अपेक्षांनुसार खेळू शकला नाही. पूरनने 14 सामन्यांत 127 च्या स्ट्राइक रेटने फक्त 234 धावा केल्या. संपूर्ण हंगामात त्याच्या बॅटमधून केवळ एक अर्धशतक आले. त्यामुळे एलएसजीच्या मधल्या फळीला अपेक्षित बळ मिळाले नाही.
7/8
मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला 16.45 कोटी रुपयांत कायम ठेवले होते. मात्र, त्याच्यासाठी हा हंगाम अत्यंत खराब ठरला. कर्णधार म्हणून खेळताना हार्दिकने 10 सामन्यांत 138 च्या स्ट्राइक रेटने फक्त 206 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक झळकले नाही. गोलंदाजीतही तो फक्त 4 विकेट्स घेऊ शकला. हंगामाच्या अखेरच्या सामन्यानंतर त्याच्या वक्तव्यांमुळे तो मुंबई इंडियन्सची साथ सोडू शकतो, अशा चर्चांनाही उधाण आले आहे.
8/8
आयपीएल 2026 मध्ये अनेक युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत आपली छाप पाडली. मात्र, काही महागडे स्टार खेळाडू अपेक्षांच्या ओझ्याखाली दबले गेले.
Published at : 02 Jun 2026 12:31 PM (IST)