Ind vs NZ Champions Trophy 2025 Final : फायनलचा महासंग्राम ठरला! भारतविरुद्ध न्यूझीलंड रंगणार थरार; LIVE सामना कधी-केव्हा-कुठे पाहायचा? A टू Z माहिती!
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव केला. यासह किवी संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

india vs new zealand champions trophy 2025 final
1/11
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव केला. यासह किवी संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
2/11
आता 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेतेपदाचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.
3/11
हा सामना 9 मार्च रोजी दुबईमध्ये होणार आहे.
4/11
दुबईमध्ये 9 मार्च रोजी हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होईल.
5/11
मिचेल सँटनर आणि रोहित शर्मा 1:55 वाजता नाणेफेकीसाठी येतील आणि नाणेफेक दुपारी 2:00 वाजता होईल.
6/11
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण 119 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताचा वरचष्मा आहे.
7/11
टीम इंडियाने 61 सामने जिंकले आहेत तर न्यूझीलंडच्या संघाने 50 सामने जिंकले आहेत.
8/11
या स्पर्धेत भारताने साखळी फेरीत न्यूझीलंडला पराभूत केले होते.
9/11
भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
10/11
दुबई स्टेडियमची खेळपट्टी संथ असेल. त्यामुळे येथे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणे हा एक चांगला पर्याय असेल.
11/11
दुबई खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजांना जास्त मदत मिळेल.
Published at : 05 Mar 2025 10:48 PM (IST)