Ind vs Pak Asia Cup Final 2025 : ज्याच्या जीवावर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली तोच खेळाडू जायबंदी, पाकिस्तानविरुद्ध फायनलमध्ये खेळणार की नाही?

आशिया कप 2025 ची अंतिम लढत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 सप्टेंबरला रंगणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी टीम इंडियाला मात्र दुखापतींचा फटका बसला आहे.

Continues below advertisement

Hardik Pandya Abhishek Sharma injured

Continues below advertisement
1/10
आशिया कप 2025 ची अंतिम लढत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 सप्टेंबरला रंगणार आहे.
2/10
या हायव्होल्टेज सामन्यापूर्वी टीम इंडियाला मात्र दुखापतींचा फटका बसला आहे.
3/10
भारतातील काही खेळाडूंना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यात अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा या तिघांचा समावेश आहे.
4/10
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हे तिन्ही खेळाडू जखमी झाले होते. त्याबाबतची पहिली माहिती सामना संपल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी दिली होती. त्यानंतर बोलिंग कोच मॉर्ने मॉर्केल यांनी पत्रकार परिषदेत मोठे अपडेट दिले.
5/10
श्रीलंकेच्या डावात पहिला षटक टाकल्यानंतर ऑलराउंडर हार्दिक पांड्या मैदानाबाहेर गेला होता.
Continues below advertisement
6/10
तर तिलक वर्मा याला हॅमस्ट्रिंगची समस्या भेडसावली. या दुखापतींबाबत सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादव यांनी माहिती दिली.
7/10
तर अभिषेक शर्माने हाताच्या दुखण्याची तक्रार केली आणि श्रीलंकेच्या डावाच्या मध्यभागी तो मैदानाबाहेर गेला.
8/10
सूर्यकुमार म्हणाले, "आमच्या अनेक खेळाडूंना सामन्यात क्रॅम्प्स आले होते. पण आम्हाला खात्री आहे की पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम लढतीपूर्वी मिळालेल्या एका दिवसाच्या विश्रांतीत ते पूर्णपणे तंदुरुस्त होतील आणि फिट होऊन मैदानात उतरतील."
9/10
एकंदरीत, श्रीलंकेविरुद्ध सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाच्या काही खेळाडूंना दुखापती झाल्या असल्या तरी चिंता करण्यासारखे काही नाही.
10/10
पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी हे सर्व खेळाडू फिट होऊन मैदानात उतरतील, अशी पूर्ण शक्यता आहे.
Sponsored Links by Taboola